जिल्हा परिषद, पंचायत समितीची तयारी सुरु : उपजिल्हा प्रमुख अविनाश बनगे यांचे संपर्क अभियान
विशेष प्रतिनिधी/ महान कार्य वृत्तसेवा
जिल्हा परिषदेसंदर्भात उच्च न्यायालयातील सुनावणी पूर्ण झाल्यानंतर लवकरच निवडणूक प्रक्रिया सुरु होणार असल्याने हातकणंगलेत शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. तालुक्यातील 11 जि. प. आणि 22 प.स मतदारसंघात संपर्क अभियान राबविले जात असून याची जबाबदारी उपजिल्हा प्रमुख अविनाश बनगे यांनी उचलली असून खासदार धैर्यशील माने यांची जन्मभूमी रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातून घटस्थापनेच्या मुहूर्तावर करण्यात आली.
न्यायालयाने 31 जानेवारीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करा असे आदेश दिल्यानंतर राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरु केली आहे. आरक्षण काय पडेल याकडे दुर्लक्ष करत गाठीभेटी सुरु केल्या आहेत. महायुतीत पक्षीय पातळीवर शिवसेनेने यात आघाडी घेतल्याचे दिसते. संपर्क अभियानावर भर दिला असून गावागावत बैठका घेवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार धैर्यशील माने, जिल्हा प्रमुख रविंद्र माने यांच्या माध्यमातून केलेल्या कामांचा बैठकांमध्ये जागर होताना दिसत आहे.
उपजिल्हाप्रमुख अविनाश बनगे यांनी सोमवारी रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील मौजे वडगाव येथे समर्थक कार्यकर्त्याची बैठक घेवून कौल जानून घेतला. तसेस गावात कोणती विकासकामे प्रलंबित आहेत. खासदार धैर्यशील माने यांच्या माध्यमातून काय करता येईल आणि अचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामाचा शुभारभ करण्यासाठी तातडीने हालचाली कशा करता येतील यावर कार्यकर्त्यांशी चर्चा केली.
यावेळी ज्येष्ठ नेते कामधेनू दूध संस्था चेअरमन रावसाहेब चौगुले, जयशिवराय ग्राम विकास पॅनलचे गटनेते सतीश वाकरेकर, ज्येष्ठ नेते श्रीकांत सावंत, सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच स्वप्निल चौगुले, माजी उपसरपंच सुनिल पाटणे, सुरेश कांबरे, रघुनाथ गोरड, गणेश पाणीपुरवठा चेअरमन आनंदा थोरवत, दूध संस्था संचालक सुभाष वाकरेकर, अमोल झांबरे, माजी सरपंच सतीश चौगुले, महादेव शिंदे, तरुण मंडळाचे कार्यकर्ते, खासदार माने, महाडिक समर्थक उपस्थित होते.
