Spread the love

समाजिक कार्यकर्ते सागर पुजारी यांच्या पाठपुराव्याला यश

कुंभोज/ महान कार्य वृत्तसेवा
हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील धनगर समजाचे श्रद्धास्थान हिव्वरखान बिरदेव मंदिर परिसराच्या विकास कामांसाठी 2 कोटींचा निधी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. पुण्यलोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेतून हा निधी मिळणार आहे. मंदिराचा ब वर्ग यात्रास्थळात समावेश करण्यापासून विकास कामांसाठी निधी मिळवण्यापर्यंत आम्ही पाठपुरवा केल्याचे हातकणंगलेतील धनगर समाजाचे नेते सागर पुजारी यांनी सांगितले. यासाठी खासदार धैर्यशील माने, माजी पालकमंत्री सतेज पाटील, आ. अशोकराव माने यांचेही सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
हिव्वरखान बिरदेव मंदिरास ब वर्ग यात्रास्थळाचा दर्जा मिळावा यासाठी सामाजीक कार्यकर्ते सागर पुजारी यांनी 8 जून 2022 ला तत्कालीन पर्यटन मंत्री आदिती तटकरे यांची मंत्रालयात भेट घेवून निवेदन दिले होते. मंत्री तटकरे यांनी तात्काळ या निवेदनावर शेरा मारुन जिल्हाधिकारी यांना अहवाल पाठवण्याचे आदेश केले होते. त्यानंतर सागर पुजारी यांनी पाठपुरावा करुन हिव्वरखान बिरदेव मंदिराचा ब वर्ग यात्रास्थळात समावेश करुन घेतला होता. दुसऱ्या टप्प्यात निधीसाठी प्रय्ात्न केला आणि शासनाने दोन कोटींचा निधी मंजूर केल्याचे पुजारी यांनी सांगितले.पहिल्या टप्प्यात 40 लाख रुपये तातडीने मिळणार आहेत. यातून भक्त निवास, केाँक्रीट रस्ते, पेव्हींग ब्लॉक, मंदिर परिसराचे सुशोभिकरण, विद्युतीकरण आदी. कामे हाती घेण्यात येणार आहेत. असे पालखे यांनी सांगितले.

असा मिळणार निधी (अकडे लाखांत)
भक्त निवास – 44.82
रस्ते काँक्रीटीकरण – 22.9
कंपाऊंड भिंत – 40.83
परिसर सुशोभिकरण – 3.54
विद्युतीकरण – 74.95


पहिल्या टप्प्यात 40 लाख
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेसाठी 800 कोटी रूपयेची तरतुद केली आहे. या योजनेतून 2 कोटी रूपयेचा निधी हिवरखान मंदिरास मिळणार आहे. यास प्रशासकीय मान्य मिळाली असून प्रथम टप्प्यात 20 टक्के म्हणजे 40 लाख रूपये तातडीने दिले असून उर्वरीत निधी टप्प्याटप्याने दिला जाणार आहे.


पाठपुराव्याचे समाधान

सन 2022 पासून हिवरखान बिरदेव मंदिरास ब वर्ग दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला यश मिळाल्याचे समाधान वाटते.

  • सागर पुजारी, सामाजिक कार्यकर्ते