Spread the love

आ. डॉ. अशोक माने यांचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन
इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
भारत देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रनी सेनानी देशभक्त पद्मश्री डॉ.रत्नाप्पाण्णा कुंभार यांची 15 सप्टेंबर रोजी होत असलेल्या ११६ वी जयंतीचे औचित्य साधून राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रभक्ती आणि संविधान मूल्यांचा संस्कार समाजमनावर
व्हावा या हेतूने त्यांची जयंती प्रतिवर्षी ग्रामपातळीपासून जिल्हास्तरापर्यंत सर्व शासकीय,निमशासकीय व सहकारी संस्था कार्यालयांत साजरी करण्यात यावी. असे निवेदन हातकणंगलेचे
आमदार डॉ. अशोकराव माने यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले .
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचे योगदान विसरण्यासारखे नाही. नव्या पिढीसमोर त्यांच्या कार्याचा आदर्श उभा राहील आणि देशभक्तांचे कार्य प्रेरणादायी ठरेल.
गोरगरीब कुटुंबांच्या उद्धारासाठी रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी आयुष्य खर्ची घातली देशाच्या स्वातंत्र्य नंतर त्यांनी अनेक सहकारी संस्था उभा करून विरोधाच्या संधी उपलब्ध करून दिल्या मंत्री पदाच्या काळात अनेक चांगले धोरणात्मक निर्णय राहून लोकहित पहिले अशा थोर नेत्याची स्मरण त्यांच्या कार्याच्या माध्यमातून लोकांसमोर आहेच. आत्ताच्या तरुण पिढीला त्यांचं कार्य माहित व्हावं या उद्देशाने त्यांची जयंती शासकीय पातळीवर साजरी करावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अशोक पाटील व  प्रसाद खोबरे उपस्थित होते.