इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
इ. दहावीच्या सर्व विद्यार्थिनी शिक्षकानी दिवसभराचे शालेय कामकाज यशस्वीरित्या पार पाडले .शिपाई, कर्मचारी, कार्यालयातील लिपीक ग्रंथपाल, प्रयोगशाळा परिचर, संगणक परिचर पर्यवेक्षिका, उपमुख्याध्यापिका मुख्याध्यापिका अशा सर्व भूमिका विद्यार्थिनीनी अतिशय चोखपणे पूर्ण केले.
इ.10 वी अ मधील वृद्धी काकडे या विद्यार्थिनीने शिक्षक दिनी मुख्याध्यापिका म्हणून संपूर्ण दिवसभराचे कामकाज पाहिले तर इ.10 वी ड मधील सुषमा चिखले इ.10 वी ब मधून वैष्णवी आगरकर इ.10 वी क मधून श्रावणी मस्के या विद्यार्थिनींनी पर्यवेक्षिका म्हणून कामकाज पाहिले.
विद्यार्थिनी शिक्षिकांनी एकूण 5 तासिका अध्यापनाच्या कामकाजासाठी अध्यापन केले,तसेच त्यांच्या पूर्वतयारी साठी दि.8 सप्टेंबर 2025 रोजी त्यांना तासिकेचे नियोजन व मार्गदर्शन करण्यात आले होते. विद्यार्थिनीनी अत्यंत काटेकोरपणे व अभ्यासपूर्ण प्रत्यक्ष वर्गावर जाऊन त्यांच्या तासिकेचे व विषयाचे अध्यापन केले यासाठी वेळापत्रक तयार करून देणे आर एम गरड सर यांनी सहकार्य केले. तर प्रत्यक्ष वर्गावर अध्यापन करण्यासाচী विषयवार मार्गदर्शन प्रशालेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी केले.
मुख्य कार्यक्रमप्रसंगी सर्वप्रथम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णनन यांच्या प्रतिमेचे पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक विद्यार्थिनी मुख्याध्यापिका वृद्धी काकडे यांनी केले. विद्यार्थिनी उपमुख्याध्यापिका सुषमा चिखले, पर्यवेक्षिका वैष्णवी आगरकर व श्रावणी मस्के, शिक्षिका उमल कसेकर, श्रद्धा लवटे, तन्वी चौगुले, जिया मुजावर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रशालेच्या मुख्याध्यापिका ए.एस.काजी यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन शिक्षकाचे स्थान व्यक्तिमत्व घडवण्यासाठी होणारे संस्कार शालेय वयातच शिक्षकाकडून केले जातात आणि म्हणूनच हा सुखद काळ स्मरणात राहतो असे मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले, यावेळी मुख्याध्यापिकांच्या शुभहस्ते विद्यार्थिनी पदाधिकारी शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.शेवटी आभार विद्यार्थिनी पर्यवेक्षिका श्रावणी मस्के यांनी मानले , सूत्रसंचालन इंद्रायणी जाधव व पूर्वा चव्हाण यांनी केले, कार्यक्रमास ज्युनि. कॉलेजचे उपप्राचार्य व्ही.जी.पंतोजी , पर्यवेक्षिका व्ही एस लोटके, पर्यवेक्षक एस एस कोळी विभाग प्रमुख श्रीमती एस एस शिंदे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
