मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चर्चेत आली आहे. दरम्यान आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. हे आंदोलन गुंडाळण्यासाठी आता राज्य सरकारने हालचाली सुरु केल्या आहेत. मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदान रिकामे करण्याची नोटीस बजावली होती. मात्र, ही नोटीस त्यांच्यापर्यंत पोहोचली नव्हती. त्यामुळे आज (2 सप्टेंबर) दुपारी काही पोलीस अधिकारी स्वत: ही नोटीस घेऊन आझाद मैदानात दाखल झालेत. परिणामी मुंबई पोलिसांनी आता धडाधड कारवाई सुरु केली आहे. आधी रस्त्यावरील गाड्या हटवल्यानंतर आता ण्एश्ऊ स्थानकातूनही आंदोलकांना बाहेर काढले जात आहे. कोर्टाचे आदेश आहेत, त्यामुळे बाहेर पडा, आशा सूचना सध्या आंदोलकांना देण्यात येत आहेत.
मराठ्यांनी रस्ते मोकळे केलेत, पण आझाद मैदान सोडणार नाही
दुसरीकडे, मराठ्यांनी रस्ते मोकळे केलेत, पण आझाद मैदान सोडणार नाही. असा आक्रमक पवित्रा मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे पाटील यांनी घेतला आहे. मुंबई पोलिसांनीजी नोटीस आम्हाला दिली आहे. त्याला आमचे वकील उत्तर देतील. मनोज जरंगे पाटील आझाद मैदान सोडणार नाहीत, आम्हाला आंदोलन करण्यापासून कुणीही थांबू शकत नाही. काल कोर्टाने जे निर्देश दिले, त्याचं आज संपूर्ण मराठा बांधव या ठिकाणी पालन करताय. सगळे रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत. मनोज दादांनी सांगितल्यानंतर सगळी वाहनं आणि मराठा बांधव हे मुंबईच्या बाहेर जाऊन थांबले आहेत. अशी माहिती ही मराठा आंदोलक गंगाधर काळकुटे पाटील यांनी दिली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात आज पुन्हा एकदा सुनावणी होणार
अशातच, मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात आज पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणी दरम्यान काल जे काही उच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत. त्याचं पालन झाल की नाही, याची माहिती न्यायालयात दिली जाणार आहे. त्यामुळे आज नव्याने काही निर्देश दिले जाणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.
