Spread the love

इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

अनेक वर्षांच्या पाठपुरानंतर इचलकरंजी शहरातील फासे पारधी समाजाला राज्य सरकारने समाज मंदिर आणि समाज संकुल चे स्वप्न पूर्ण केले. परंतु, महापालिकेने राज्य शासनाने निधी देऊनी ठेकेदाराला पैसे न दिल्यामुळे समाजबांधवातून तीव्र संताप व्यक्त होत असून ठेकदारही आर्थिक अडचणीत सापडला आहे. सोमवार पर्यंत ठेकेदाराचे बिल न दिल्यास महापालिकेसमोर भीक मागून ठेकेदारला पैसे द्यावे लागतील, असा खणखणीत इशारा पारधी समाजाचे अध्यक्ष मोहन काळे यांनी दिला आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांना निवेदनही दिलेल आहे.

इचलकरंजीत पारधी समाजाची वस्ती मोठी आहे. परंतु समाज मंदिर अथवा समाज संकुल नसल्यामुळे समाजाच्या सार्वजनिक कार्यक्रमावरती मर्यादा येत होत्या. समाजाला सांस्कृतिक सभागृह मिळावे, यासाठी संघटनेचे अध्यक्ष मोहन काळे सातत्याने पाठपुरावा करत होते. याला वर्षभरापूर्वी यश आलं आणि आदिवासी मंत्रालयाने लिगाडे मळा येथे समाज मंदिर आणि समाज संकुल बांधण्यासाठी 19 लाख 82 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. यानंतर समाजाने पुढाकार घेऊन ठेकेदारामार्फत काम सुरू केलं.

पहिल्या टप्प्यात घोडेगाव येथील आदिवासी कार्यालयाने आठ लाख रुपये दिलेही त्यानंतर मात्र उर्वरित निधी लवकर मिळेना झाला. या संदर्भात मोहन काळे यांनी घोडेगाव कार्यालयाशी चकरा मारून 4 लाख 96 हजार आणि 3 लाख 27 हजार असे दोन धनादेश 19 ऑगस्ट20 24 रोजी महापालिकेकडे जमा केले. आणि संबंधित ठेकेदारला बिल काढण्याची विनंती केली. या प्रकरणाला 10 महिने झाले तरीही महापालिकेकडून ठेकेदाराला बिल दिले गेले नाही. त्यामुळे उसनवारीवर बांधकाम साहित्य दिलेले व्यापारी ठेकेदार आणि काळे यांच्या पाठीमागे वसुलीसाठी लागले आहेत. गेले दहा महिन्यांपासून या कामातील 8 लाख रुपये महापालिका फुकटात वापरत आहे. या रकमेच्या व्याजासह ठेकेदाला रक्कम अदा करावी अशी मागणी पारधी समाजातून होत आहे. आता पहावे लागेल आयुक्त पल्लवी पाटील हे प्रकरण किती गांभीर्याने घेतात.

आमदार राहुल आवाडे यांनी लक्ष घालावे

इचलकरंजीतील पारधी समाज गेले चार पिढ्यांपासून आवाडे परिवारासोबत आहे. त्यामुळे आमदार राहुल आवाडे यांनीच या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालावं अशी मागणी समाज बांधवातून होत आहे.

भीक मागायला लावू नका

इचलकरंजीतील पारधी समाज कष्टकरी आहे. निधी  कमी पडल्यानंतर समाजाने वर्गणी काढून समाज मंदिर आणि समाज संकुलचे काम पूर्ण करून घेतले. परंतु हक्काचा निधी महापालिका वापरत आहे. हे अतिशय चुकीच आहे.त्यांनी तातडीने संबंधित ठेकेदाराला बिल द्याव आणि आम्हाला भीक मागण्याची वेळ येऊ देऊ नये.

  • मोहन काळे,  अध्यक्ष, फासे पारधी समाज संघटना