मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
केंद्र सरकारने चांदीच्या शुद्धतेबाबत एक महत्त्वाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. आता 1 सप्टेंबरपासून चांदीच्या दागिन्यांवरही हॉलमार्किंगची मोहोर उमटणार आहे. जीएसटीसह प्रति किलो चांदीची किंमत एक लाख 16 हजारांवर पोहोचली आहे. त्यामुळं चांदीत भेसळ होण्याची शक्यता असते. त्यासाठीच सरकारने आता चांदीवरही हॉलमार्क लागू केला आहे.
ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्स ने स्पष्ट केले आहे की, हॉलमार्किंग सुरुवातीला एच्छिक स्वरुपात असणार आहे. सराफांना हॉलमार्किंग करणे बंधनकारक नाही. पण ते स्वत:च्या इच्छेनुसार करु शकतात. मात्र पुढील काळात हा नियम अनिवार्य असणार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हॉलमार्कचा शिक्का असलेले चांदीमुळं ग्राहकांमध्ये अधिक विश्वास निर्माण होईल.
हॉलमार्किंगची प्रक्रिया ही सोन्याच्या दागिन्यांसाठी सुरू करण्यात आलेल्या हॉलमार्किंगनुसारच असणार आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सकडून लागू करण्यात आलेल्या या नियमांनुसार चांदीची गुणवत्ता आणि शुद्धता ओळखणे ग्राहकांना सोप्पे जाणार आहे. या नियमामुळं चांदीच भेसळ करणारे किंवा फसवणूक करणाऱ्यांवर चाप बसणार आहे. त्याचबरोबर ग्राहकांना शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण दागिने मिळणार आहेत.
चांदीसाठी असतील 6 नवीन हॉलमार्क
चांदीच्या शुद्धतेची तपासणीसाठी ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सने 6 मानक तयार केले आहेत. या मानकच्या माध्यमातून चांदी किती टक्के शुद्ध आहे हे पडताळले जाईल. नवी व्यवस्थाअंतर्गंत ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्सने चांदीसाठी एकूण सहा शुद्धतेचे नियम ठरवले आहेत. यात 900,800,835,925,970 आणि 990 असे सहा टप्पे असतील.
हॉलमार्क का गरजेचा?
हॉलमार्क हे केंद्र सरकारच्या बीआयएस या संस्थेने दिलेली एक प्रमाणित खूण असून ती चांदी किंवा सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता आणि गुणवत्ता सिद्ध करते.
हॉलमार्क का महत्त्वाचे?
कोणत्याही दागिन्यांची खरेदी-विक्री करताना त्याची शुद्धता समजते. तसेच व्यवहार चोख आणि पारदर्शकपणे होण्यास मदत होते. ग्राहकास गरज पडल्यास तक्रार नोंदवण्यासाठी आधार मिळतो. पुन्हा विक्रीच्या वेळी योग्य किंमत मिळते.
1 – 990 क्रमांक
जर कोणत्याही चांदीच्या दागिन्यांवर 900 हा आकडा लिहिलेला असेल तर त्याचा अर्थ असा की तो चांदीचा सर्वात शुद्ध प्रकार आहे. या आकड्याचा अर्थ असा की चांदी 99 टक्के शुद्ध आहे. अशा चांदीला बारीक चांदी असेही म्हणतात. अशा चांदीचा वापर बार किंवा नाण्यांच्या स्वरूपात केला जातो. ती खूप मऊ असते, म्हणून ती दागिन्यांमध्ये क्वचितच केली जाते.
2 – 970 क्रमांक
जर कोणत्याही चांदीच्या दागिन्यांवर 970 क्रमांक लिहिलेला असेल तर याचा अर्थ असा की हा दागिना 97 टक्के शुद्ध आहे. अशा चांदीचा वापर दागिने आणि भांडी बनवण्यासाठी केला जातो.
3 – 925 क्रमांक
या आकड्याचा अर्थ असा की चांदी 92.5ज्ञब शुद्ध आहे. या चांदीला स्टर्लिंग चांदी असेही म्हणतात. अशा चांदीला दागिने बनवण्यासाठी चांगले मानले जाते.
4 – 900 क्रमांक
जेव्हा कोणत्याही चांदीच्या दागिन्यांवर 900 हा आकडा लिहिलेला असेल तेव्हा असे मानले जाईल की ही चांदी 90 टक्के शुद्ध आहे. या प्रकारची चांदी काही दागिने आणि चांदीच्या नाण्यांमध्ये वापरली जाते.
5 – 835 क्रमांक
या संख्येचा अर्थ चांदीची शुद्धता 83.5 टक्के आहे. अशा परिस्थितीत, जर चांदीच्या दागिन्यांवर 835 क्रमांक लिहिलेला असेल तर ते किती टक्के शुद्ध आहे ते समजून घ्या.
6 – 800 क्रमांक
जर कोणत्याही चांदीच्या दागिन्यांवर 800 क्रमांक लिहिलेला असेल तर ते चांदी 80 टक्के शुद्ध आहे असे मानले जाईल. त्यात तांब्यासारख्या इतर प्रकारच्या वस्तूंचे मिश्रण फक्त 20 टक्के आहे.
