मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
गणेश चतुर्थीला अभिनेता सलमान खाननं कुटुंबासह त्याच्या घरात गणपती बाप्पाची स्थापना केली आहे. 27 ऑगस्टच्या रात्री अभिनेत्यानं त्याच्या घरातून गणेश वंदना आणि आरतीचा भक्तिपूर्ण देखावा शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या संपूर्ण कुटुंबासह गणेश आरती करताना दिसत आहे. सलमान खाननं त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे, जो त्याच्या चाहत्यांना खूप आवडत आहे. ‘भाईजान’नं शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो कुटुंब आणि नातेवाईकबरोबर असल्याचा दिसत आहे.
‘भाईजान’नं शेअर केला व्हिडिओ : व्हिडिओमध्ये सलीम खान, सुशीला चक्र, अरबाज खान, सोहेल खान आणि सलमान खान त्याची बहीण अलविरासह गणेश आरती करताना दिसत आहेत. सध्या संपूर्ण घरात गणपती बाप्पा मोरयाचा जयजयकार सुरू आहे. सलमान खानच्या या व्हिडिओला त्याच्या 15 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक केलंय. या व्हिडिओच्या पोस्टमध्ये गणपती बाप्पा मोरया असं अनेकजण लिहित आहे. तसेच अनेक चाहत्यांनी ‘भाईजान’ला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान सलमानच्या या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख पत्नी जेनेलिया आणि त्याच्या दोन मुलांसह असल्याचा दिसत आहे.
सलमान खानचा आगामी चित्रपट : तसेच सलमान खानच्या या व्हिडिओवर एका यूजरनं लिहिलं आहे की, ‘गणपती बाप्पा आमच्याकडे पण या.’ याशिवाय सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो सध्या ‘बिग बॉस 19’बरोबर त्याच्या आगामी चित्रपट ‘बॅटल ऑफ गलवान’चे शूटिंग करत आहे. सलमाननं नुकतेच चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे आणि चित्रपटाचा पहिला सेट लडाखमध्ये उभारण्यात आला आहे, जिथून चित्रपटाचे दिग्दर्शक अपूर्व लाखिया यांनी फोटो शेअर केले आहेत. आता सलमानला या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत. ‘गलवानची लढाई’ : ‘गलवानची लढाई’ ही 15 जून 2020 रोजी लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या भीषण चकमकीवर आधारित आहे. या चकमकीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते, ज्यात कर्नल बी. संतोष बाबू यांचाही समावेश होता. दरम्यान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव कमी करण्यासाठी दोन्ही सैन्यांमध्ये चर्चा सुरू असताना ही चकमक झाली होती.
