Spread the love

विशेष प्रतिनिधी/ महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी येथील बेकायदेशीर खोद काम करुन शासनाचा महसूल बुडवलेल्या त्या व्यापाऱ्यांनी दंडाची रक्कम कमी करण्यासाठी महसूल प्रशासनासमोर अक्षरश लोटांगण घातले आहे. त्यामुळे प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे तक्रारदारांचे लक्ष लागले आहे. ससंदर्भातील सुनावणी 4 सप्टेंबरला होणार आहे. दरम्यान दंडात्मक कारवाई  थांबवण्यासाठी प्रशासनावर राजकयी दबावही टाकण्याच्या हालचाली सुरु असल्याचे कळते. त्यामुळे आता पहावे लागले, प्रशासन राजकीय दबाव घेते की शासनाच्या तिजोरीत महसूल भर टाकते.
महिन्याभरापूर्वी गोंधळी गल्लीतील सिसनं 109-अ ही मिळकत शहरातील काह व्यापारी आणि त्यांच्या नातेवाईकांनी खरेदी करुन त्याठिकाणी कॉम्पलेक्स उभारणीसाठी खोदकाम केले होते. महापालिकेने दिलेला बांधकाम परवाना धाब्यावर बसवून गौण खनिज माफियाच्या माध्यामातून बेसुमार उत्खनन करुन गौण खनिजची विल्हेवाट लावली.  या  खोदकामासाठी कोणताही महसुली परवना घेतलेल नाही. रॉयल्टी भरलेली नाही. तसेच शेजारच्या घरानांही खोदकामामुळे धोका निर्माण झाल्याने शेजारी धनाजी धुमाळ यांनी महापालिका अप्पर तहसीदार यांच्याकडे तक्रार करुन पाठपुरावा सुरु केला. शासनाची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अप्पर तहसीदारांनी पंचनामा केला. यात 153 ब्रास मुरूम खोदकाम झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर 8 लाख 90 हजार 665 रुपयांचा दंड ठोठावला. त्यामुळे व्यापाऱ्यांचे दाबे दणाणले. यावर प्रांताधिकाऱ्यांकडे दंड कमी करण्यासाठी अर्ज दाखल केला असून 4 सप्टेंबरला यावर सुनावण ठेवण्यात आली आहे.

बांधकाम बंद
महसूल प्रशासनाने कारवाई सुरु केल्यानंतर महापालिकेनेही बांधकाम परवाना रद्द करण्याच्या हालचाली सुरु केल्या. मात्र अद्याप बांधकामच सुरु न केल्याने ही प्रक्रिया काळी काळासाठी लांबणीवर पडल्याचे समजते.
चौकट-
त्या प्रॉपर्टीवर बोजा नोंद होणार
मुदत देवूनही दंडाची रक्कम न भरल्याने अप्पर तहसीलदार यांनी संबधीत मालमत्तेवार बोजा नोंद करण्याचे आदेश दिले. परंतु यावर प्रातांधिकाऱ्यांकडे संबधितानी अपिल केल्याने येथील निर्णयानंतर पुढील कारवाई होवू शकते.

दंडाच्या नोटीस नंतर रॉयल्टीचे चलन
कोणत्याही परिस्थितीत कारवाई होणार यातून सुटका करुन घेण्यासाठी दंडाच्या नोटीस बजावल्यानंतर त्या व्यापाऱ्यांनी रॉयल्टीचे 36000 ऑनलाईन चलन भरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यासाठी पूर्व परवानगी घेतलेली नाही. यासंदर्भातही हरकत घेतल्याचे तक्रारदार धुमाळ यांनी सांगितले.