नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा
अनेकदा प्रवासाला निघत असताना सोबत काहीतरी खायला नेण्याची बऱ्याचजणांची सवय आहे. फार काही नसेल तर किमान पार्लेजी बिस्कीटाचा पुडा तरी सोबत नेला जातो. काही मंडळी भुजिया किंवा त्याच पद्धतीच्या शेव- चिवड्याला पसंती देतात. खिशाला परवडणारे आणि पोटभरीचे हे पदार्थ प्रवास म्हटला की आपोआप बॅगेत जागा बनवतात. पण, 10 रुपयांना मिळणारं हेच बिस्कीट एकाएकी 400 रुपयांना मिळू लागलं तर…? प्रश्न वाचूनच धक्का बसला ना?
खरंच 400 रुपयांना मिळतंय पार्ले-जी बिस्कीट?
भारतात दुकानांमध्ये अगदी सहजपणे मिळणारं पार्लेजी बिस्कीट खरंच 400 रुपयांना विकलं जात असून, गोंधळण्याचं कारण नाही. कारण, ही बिस्कीटाची भारतातील नव्हे तर अमेरिकेतील किंमत आहे. परदेशात त्यातही अमेरिकेत गेल्या काही वर्षांमध्ये बरीच भारतीय पदार्थांची चव देणारी रेस्तराँ सुरू झाली आहेत. पण, देशापासून दूर राहणाऱ्या भारतीयांचा आनंद खऱ्या अर्थानं तेव्हा द्विगुणिक होतो जेव्हा त्यांना तिथं आलू भुजिया, पार्लेजी बिस्कीट सहजपणे उपलब्ध होतं.
अमेरिकेच्या वॉलमार्ट नावाच्या ण्प्रग्ह शॉपमध्ये डलास इथं एका भारतीयाला हल्दीरामच्या आलू भुजिया, चिकन बिर्याणी मसाला इतकंच नव्हे तर पार्ले-जी, मारी, गुड डे अशी बिस्कीटंसुद्धा मिळत असल्याचं पाहून प्रचंड आनंद झाला.
वॉलमार्टमध्ये मिनी इंडिया…
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये डलासच्या वॉलमार्टमधील शेल्फवर भारतीय स्नॅक्स आणि पॅकेज्ड फूड पाहून वॉलमार्ट हे जणू मिनी इंडियाच आहे अशीच प्रतिक्रिया या भारतीयानं दिली आहे. राहिला मुद्दा या भारतीय वस्तूंच्या किमतीचा तर, तिथं मसूर डाळ, मूग डाळ या आणि अशा 4 डॉलर रुपयांना मिळणाऱ्या वस्तूंची किंमत भारतीय चलनांमध्ये पाहायची झाल्यास 350 ते 400 रुपयांच्या घरता असल्याचं स्पष्ट होत आहे. परदेशात मिळणाऱ्या भारतीय वस्तूंच्या किमतींविषयी अनेकांमध्ये कायमच कुतूहल पाहायला मिळतं आणि हा व्हिडीओसुद्धा इथं अपवाद ठरत नाहीय. प्रत्यक्षात अमेरिकेसारख्या देशांमध्ये किमान वेतन 7.25 डॉलर म्हणजेच साधारण (582 रुपये प्रतितास) इतकं आहे. ज्यामुळं सहाजिकच आंतरराष्ट्रीय चलन नियमानुसार भारतीय पदार्थांच्या तिथं असणाऱ्या किमती इतक्या जास्त असून तेथील वेतन परिमाणानुसार हे पदार्थ खरेदी करणं फारसं आव्हानात्मक ठरत नाही
