मुंबई / महान कार्य वृत्तसेवा
भारतीय कसोटी आणि टी-20 क्रिकेट संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या चर्चेचा केंद्रबिंदू आहे. रोहित अजूनही क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे, तरीही तो चर्चेत आहे. कधी कधी असं म्हटलं जातं की रोहित शर्मा आता वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त होणार आहे, तर कधी असं म्हटलं जातं की रोहितला वनडे क्रिकेटच्या कर्णधारपदावरुन काढून टाकलं जाऊ शकतं. वनडे कर्णधारपदासाठीही दररोज नवीन दावेदार समोर येतात. यादरम्यान, स्वत: रोहित शर्मानं कसोटी क्रिकेटमधील निवृ्त्तीबाबत वक्तव्य केलं आहे.
कसोटी आणि टी-20 क्रिकेटमधून रोहित निवृत्त : रोहित शर्मा कसोटी क्रिकेट खेळत नाही किंवा तो टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत टीम इंडियाचा भाग नाही. 2024 मध्ये त्याच्या नेतृत्वाखाली टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्यानं या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली. त्याच वेळी, जेव्हा टीम इंडिया काही दिवसांपूर्वी कसोटी मालिकेसाठी इंग्लंडला जाण्याची तयारी करत होती, तेव्हा त्यानं कसोटी क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला. आता तो फक्त वनडे क्रिकेट खेळत आहे आणि सध्या तो कर्णधार देखील आहे. सध्या भारतीय संघ जास्त वनडे सामने खेळत नाहीये, त्यामुळं रोहितही खेळत नाहीये. अशातच सोमवारी मुंबईत एका कार्यक्रमादरम्यान रोहित पोहोचला आणि त्यानं त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या.
काय म्हणाला रोहित शर्मा : या कार्यक्रमादरम्यान एक पॅनेल चर्चा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये रोहित शर्मा म्हणाला, ”तुम्हाला कसोटी क्रिकेटसाठी तयारी करावी लागेल. हा असा खेळ आहे ज्यामध्ये तुम्हाला बराच काळ मैदानावर राहावे लागते. कसोटीत तुम्हाला पाच दिवस खेळावं लागतं. मानसिकदृष्ट्या ते खूप आव्हानात्मक आणि थकवणारं असतं. रोहित शर्मानं असंही म्हटलं की सर्व क्रिकेटपटू प्रथम श्रेणी क्रिकेट खेळून मोठे झाले आहेत. मात्र यात रोहितनं त्याच्या कसोटी निवृत्ती किंवा भविष्यातील योजनांबद्दल काहीही सांगितलं नाही.
ऑक्टोबरमध्ये खेळताना दिसू शकतो रोहित : भारतीय क्रिकेट संघ या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करणार आहे, ज्यात तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाईल. आतापर्यंत, रोहित वनडे संघाचं नेतृत्व करताना दिसत आहे. हो, जर अचानक बदल झाला नाही, तर कमान त्याच्या हातात राहील. ही ती मालिका असेल जेव्हा रोहित शर्मा आणि विराट कोहली बऱ्याच काळानंतर पुन्हा खेळताना दिसतील. या मालिकेनंतर रोहित आणि कोहली खेळत राहतील का की 2027 च्या वनडे विश्वचषकापर्यंत खेळण्यासाठी ते दुसरा काही निर्णय घेतील? यावर सर्वांचं लक्ष नक्कीच राहील.
