इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
सुट्टीसाठी आलेल्या कुरुंदवाड येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण केलेच्या आरोपातील संशयित सुरज यशोब ढाले व प्रमोद उत्तम मोहिते दोघे (राःलाल नगर, तेरवाड) या दोघांची सबळ पुराव्या अभावी येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांनी निर्दोष मुक्तता केली.
संशयित दोन्ही आरोपींनी तिला फूस लावून पळवून नेले. असे आशयाची फिर्याद मुलीच्या मामाने शिवाजी नगर पोलीस ठाणे येथे दिली होती. त्या अनुशंगाने पोलिसांनी संशयितांना अटक करून पिडीतेला कर्नाटक मधून ताब्यात घेतले. सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र दाखल झाले नंतर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधिश यांचे न्यायालयात सदर खटल्याची सुनावणी सुरु झाली. सुनावणीत फिर्यादी, तपासी अधिकारी शरयू देशमुख यांचेसह ४ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आले.
बचाव पक्षाचे वकील अॅड.मेहबूब बाणदार यांनी पोलीस अधिकारी यांच्या उलट तपासावेळी न्यायालयाचे लक्ष मुलीच्या १६४ च्या जबाबाकडे वेधून प्रेम प्रकरणातून स्वतःहून निघून गेलेचे कबूल केले. ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यामुळे अपहरणाचे घटक तिने सिद्ध होत नाहीत, मुलीचा जन्म दाखला नाही, जबाबात विसंगती आहे. हा युक्तिवाद बचाव पक्षाचे वकील अॅड.मेहबूब बाणदार यांनी मांडला. अॅड.मेहबूब बाणदार यांना अॅड.देवांशिष बोहरा, अॅड.रचना पाटील, अॅड.अश्पाक देसाई, अॅड.सिकंदर शेख यांनी सहाय्य केले.
