इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
येथील गर्ल्स हायस्कूल इचलकरंजीच्या विद्यार्थिनींनी जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत आपले कौशल्य दाखवत भरघोस यश संपादन केले आहे. पलक केशरवाणी हिने स्पर्धेत प्रथम क्रमांक, तर अपूर्वा वाघमारे हिने द्वितीय क्रमांक पटकावला.
संयोजकांच्या वतीने त्यांना गोल्ड व सिल्वर मेडल देऊन सन्मानित करण्यात आले
*राजीव गांधी भवन, इचलकरंजी येथे झालेल्या या शासकीय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत दोन्ही विद्यार्थिनींनी नेत्रदीपक कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधले. त्यांच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्ज्वल झाले असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
