इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
डीकेटीईच्या कोअर ब्रॅचेंस चे मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल व सिव्हील इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांची विविध नामांकीत बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. डीकेटीई ही संस्था इंजिनिअरींगमधील विद्यार्थ्याना प्लेसमेंट गुणवत्ता वाढीसाठी व उद्योजकता गुणांचे वाढ करुन त्या विद्यार्थ्यांना कार्यक्षम बनविण्यासाठी व तंत्रशिक्षणामधील विद्यार्थ्यांना उत्तम पॅकेजवरती नोकरी देण्यासाठी सतत प्रयत्नशील असते.
डीकेटीईचे माजी विद्यार्थी व इंडस्ट्री यांचे चांगले हितसंबध असल्यामुळे डीकेटीईच्या तिन्ही विभागातील प्लेसमेंट हे शंभर टक्के होत आहेत. डीकेटीईच्या तीन्ही विभागामार्फत विद्यार्थ्यांना इंडस्ट्रीमधील नवनविन बदलांचा अभ्यास करण्यासाठी इंडस्ट्री व्हीजीट, इंडस्ट्री ट्रेनिंग यांचे वेळोवेळी आयोजन केले जाते यामुळेच डीकेटीईच्या कोअर विभागातील प्लेसमेंट हे शंभर टक्के होत आहेत.
ब्रुकहार्ट कॉम्प्रेशिएन,अदानी पॉवर, टाटा पॉवर, टीसीएस, डॅनफॉस, सी.जी. पॉवर, ऍटलस कॅप्को, जॉन्सन कंट्रोल, कॅपजेमिनी, हेक्सावेअर, ऑक्टॅगॉन, व्हर्टीव सो, विप्रो पारी अशा नामांकित कंपनीमध्ये डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची उत्तम पॅकेजवरती निवड झाली आहे. डीकेटीईच्या कोअर ब्रँचेसचा अभ्यासक्रम तयार करताना विद्यार्थ्यांना अद्यायावत टेक्नॉलॉजी, सॉफ्टवेअर्स, नविन तंत्रज्ञान तसेच कॉम्प्युटर प्रोग्रामिंग भाषांचे ज्ञान मिळेल अशा पध्दतीने सारासार विचार करण्यात आला आहे.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ.सौ.एल.एस.अडमुठे, डे.डायरेक्टर डॉ यु.जे.पाटील, विभागप्रमुख डॉ. व्ही.आर. नाईक, प्रा. डॉ. आर.एन.पाटील, प्रा. ए.एल.मुल्ला टीपीओ जी.एस. जोशी यांचे मार्गदर्शन लाभले.
