इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
रोटरी क्लब एक्झिक्युटिव्हच्यावतीने येथील महापालिका संचलित आधार शहरी बेघर निवारा केंद्रासाठी जीवनावश्यक साहित्य भेट देण्यात आले. यामध्ये ३० कॉट, ३० गाद्या, ३० ब्लँकेट्स आणि एक दुरदर्शन संचाचा समावेश आहे. या सुविधेमुळे निवारा केंद्रात राहणार्या नागरिकांना अधिक चांगल्या सोयी-सुविधा उपलब्ध होणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुण्या महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी बेघर, वंचित घटकांसाठी सुविधा निर्माण करणे ही खरी समाजसेवा आहे. रोटरी क्लबने उचललेले पाऊल इतर संस्थांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्टचे गव्हर्नर अरुण भंडारे यांनी रोटरी ही केवळ एक संस्था नसून ती समाज परिवर्तनाची चळवळ असल्याचे सांगितले. आधार शहरी बेघर निवारा केंद्रातील ही साहित्य भेट केवळ मदत नव्हे तर मानवतेचा एक जिवंत संदेश असल्याचे उपस्थितांनी नमूद केले. कार्यक्रमास रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष साधले, सचिव मयुर पाटील, प्रकल्प प्रमुख प्रकाश मोरबाळे, सह प्रमुख सतीश मेटे, अमित खानाज, विवेक हासबे, गणेश निकम, अरुण चौगुले, गिरीश कुलकर्णी, राजेश कोडुलकर, विठ्ठल तोडकर, सुधीर लाटकर, सुनील मांगलेकर, आर.बी.पाटील, कल्पेश मेहता, रवि कोळेकर, सुनील मांगलेकर यांच्यासह रोटरॅक्ट क्लब एक्झिक्युटिव्हचे सदस्य उपस्थित होते.
