इचलकरंजीतअंमली पदार्थ विरोधी चळवळ बळकट करण्यासाठी विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली
इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
येथील गावभाग पोलीस ठाण्याच्यावतीनं शहरातील मुख्य मार्गावरुन अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत सहभागी झालेल्या विविध शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते.
येथील गावभाग पोलीस ठाण्याच्यावतीनं अंमली पदार्थ विरोधी जनजागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातील मुख्य मार्गावरुन काढण्यात आलेल्या या रॅलीतील सहभागी विद्यार्थ्यांनी हातात घेतलेले प्रबोधनपर फलक सर्वांचे लक्ष वेधत होते. या रॅलीच्या माध्यमातून अंमली पदार्थांचं सेवन म्हणजे यमराजाचे आगमन, सर्वांनी मिळुन धरु हात-अंमली पदार्थांचा करु पर्दाफाश, गांजा-चरस-एमडी टाळा, जीवनाचा खरा गोडवा सांभाळा, नको अंमली पदार्थांची नशा-आयुष्याची होईल दुर्दशा अशा आशयाचे संदेश देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या जयघोषानं मुख्य मार्ग दुमदुमुन गेला होता.यावेळी पोलीस अधिकार्यांनी मार्गदर्शन केले, या रॅलीमुळे समाजात अंमली पदार्थ
विरोधी चळवळ बळकट होण्यास हातभार लागणार असल्याचा विश्वासही पोलीस प्रशासनानं व्यक्त केला. या रॅलीत गावभाग पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड तसंच विविध शाळेतील विद्यार्थी , शिक्षक सहभागी झाले होते.
