इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
रोजी श्री चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक संस्था संचलित,तात्यासाहेब मुसळे बाल विद्या मंदिर येथे बालचमुंच्या उस्फुर्त प्रतिसादात बालरंगभूमी परिषद इचलकरंजी शाखा समन्वयक प्रा.मिलींद दांडेकर यांच्या मार्गदर्शना खाली इतिहास महाराष्ट्राचा ही स्पर्धा संपन्न झाली.बालचमुंसह बालरंगभूमी परिषद इचलकरंजी शाखा अध्यक्ष मनिष आपटे, मुख्याध्यापिका वैशाली काडे,इचलकरंजी शाखेचे व्हि.आर. कुलकर्णीं सर,कोषाध्यक्ष प्रशांत चाळके या मान्यवरांच्या हस्ते नटराज पूजन करणेत आले.स्पर्धेच्या सुरुवातीस छ.शिवरायांचा ध्येयमंत्र संचालक प्रदिप कांबळे यांनी सांगितला.ऐतिहासीक वेशभूषेसह सुमारे ३३ बालचमुं एकल तसेच सांघिक गटात सहभागी झाले होते, कार्याध्यक्षा सौ.गौरी लक्ष्मण पाटील यांनी सुत्रसंचालन केले.स्पर्धेचे परिक्षण उपाध्यक्ष संजय सातपुते व रंगकर्मी अरुण दळवी यांनी केले. यावेळी शिक्षक- शिक्षिका यांचेसह सचीव श्रीपाद कुलकर्णीं, कार्यवाहक सचीन चौधरी,संजय कांबळे उपस्थीत होते.विजेत्या बालचमुंना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह तसेच रोख पारितोषीक मान्यवरांच्या शुभहस्ते देण्यात आले. सहभागी बालचमुंना सहभाग प्रमाणपत्रासह शैक्षणिक साहित्य देण्यात आले.मध्यवर्ती मुंबई च्या अध्यक्षा ॲड. निलमताई शिर्के- सामंत यांच्या संकल्पनेतुन महाराष्ट्रातील ३० शाखा मधुन सदर स्पर्धा संपन्न झाल्या असुन अंतीम फेरी २३ व २४ आॕगस्ट रोजी मुंबई येथे संपन्न होणार आहे.
