इचलकरंजी /महान कार्य वृत्तसेवा
विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विकास विद्यामंदिर व चौगुले बालवाडी मध्ये दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे अध्यक्ष विकास चौगुले यांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना त्यांनी शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक करून शाळेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मुख्याध्यापिका सपना मेळवंकी यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी दहीहंडीच्या गाण्यांवर नृत्य सादर केले.नक्ष जनवाडे व शिवन्या पाटील हे विद्यार्थी राधा कृष्णाच्या वेशभूशेत सहभागी झाले होते. तसेच तीन थरांचा मनोरा रचून नक्ष जनवाडे या कृष्णाने दहीहंडी फोडली. यावेळी शिक्षक ,विद्यार्थी,पालक तसेच परिसरातील नागरिकांची लक्षणीय उपस्थित होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता पाटील यांनी केले.
