Spread the love

हातकणंगले, पेठवडगाव, हुपरी पालिका निवडणूक प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध ; 31 ऑगस्ट दुपारी 3 पर्यंत हरकती देण्याची मुदत

विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

गेले अनेक दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या हातकणंगले, पेठवडगाव, हुपरी पालिका निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली. ती पाहण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी पालिकांमध्ये गर्दी केली होती. संदर्भात काही सूचना हरकती असल्यास हातकणंगले नगरपंचायतीसाठी 21 तर हुपरी आणि पेठवडगाव पालिकेसाठी 31 ऑगस्टपर्यंत देण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर यावरती सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात येणार आहे.

हातकणंगले नगरपंचायतीसाठी 17 प्रभाग 17 नगरसेवक, पेठवडगाव नगरपालिकेसाठी 10 प्रभाग 20 नगरसेवक तर हुपरी नगरपालिकेसाठी दहा प्रभाग 21 नगरसेवक अशी प्रारूप रचना आहे. हातकणंगले मध्ये एक प्रभाग एक नगरसेवक पेठवडगाव मध्ये एक प्रभाग दोन नगरसेवक तर हुपरीमध्ये नऊ प्रभागांमध्ये दोन सदस्य याप्रमाणे 18 नगरसेवक व 10 क्रमांकाच्या प्रभागांमध्ये तीन सदस्य असे एकूण 21 नगरसेवक निवडायचे आहेत.

सोमवारी सकाळी 11 वाजता पालिकेच्या दर्शनी फलकावरती प्रारूप प्रभाग रचनेची यादी प्रसिद्ध करण्यात आली. कोणत्या प्रभागात कोणता एरिया येतो हे पाहण्यासाठी पालिकांमध्ये ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती या प्रभाग रचनेत काही इच्छुकांची निराशा झाल्याची दिसते राहायला एका प्रभागात तर तयारी दुसऱ्या प्रभागात केली अशी परिस्थिती काही ठिकाणी झालेली आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हरकती दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशी झाली प्रारूप रचना
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार हातकणंगले नगरपंचायतीसाठी एका प्रभागात किमान 805 लोकसंख्या निश्चित करण्यात आली आहे तर हुपरी आणि पेठ वडगाव नगरपालिकेसाठी दोन सदस्य प्रभागासाठी 2480 ते 3000 व तीन सदस्य प्रभागासाठी 3700 ते 4500 अशी लोकसंख्या गृहीत धरून प्रारूप प्रभाग रचना निश्चित करण्यात आले ही रचना करत असताना 2011 रोजी झालेल्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेण्यात आली आहे.

हातकणंगले
प्रभाग 17 नगरसेवक 17
पेठवडगाव
प्रभाग 10 नगरसेवक 20
हुपरी
प्रभाग 10 नगरसेवक 21