Spread the love

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील महिला भगिनींकडून “एक राखी देवा भाऊंसाठी” या संकल्पनेतून तब्बल १५ हजार राख्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवण्यात आल्या. या राख्या आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. या वेळी प्रकाश दत्तवाडे शहराध्यक्ष श्रीरंग खवरे,शशिकांत मोहिते,बाळासाहेब माने, नजमा शेख, सपना भिसे, पूनम जाधव, अर्चना कुडचे, मंगल सुर्वे, अमिता बिरंजे आदी उपस्थित होते. महिलांनी मुख्यमंत्री यांना भावाप्रमाणे सन्मान देत त्यांच्या दीर्घायुष्य व कार्यक्षमतेसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.