Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
पत्नीच्या नादी लागल्याच्या कारणावरुन संतप्त झालेल्या पतीने आपल्या भावाच्या मदतीने मित्राचाच दगडी वरवंट्याने ठेचून खून केल्याची घटना शहापूर येथील गणेशनगर गल्ली नंबर ३ मध्ये शनिवारी रात्री साडेआकरा वाजणच्या सुमारास घडली. विनोद आण्णासो घुगरे (वय ३२, रा. गल्ली नं. ३, गणेशनगर, शहापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी सौ. वनिता सचिन बोरगे (रा. गणेशनगर, गल्ली नंबर ३) यांनी शहापूर पोलीसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघां संशयीतांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान याप्रकरणी संतोष दशरथ उर्फ वसंत पागे उर्फ नागणे (वय ३८) आणि संजय दशरथ पागे (वय ३६, दोघे रा. गल्ली नं.तीन, गणेशनगर, शहापूर, ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या दोघांनी विनोद आण्णासो घुगरे (वय ३२, रा. गल्ली नं. ३, गणेशनगर, शहापूर) या तरुणाचा खून केला.ही घटना १६ ऑगस्ट रोजी रात्री संतोष पागे यांच्या गणेशनगर येथील घरी घडली. संशयीत संतोष पागे यांच्या पत्नीच्या नादाला मयत विनोद घुगरे लागला होता. यावरुन त्यांच्यात वादही झाले होते. या वादाचे पर्यावसन शनिवारी रात्री खूनात झाले. दोघा संशयितांनी दगडी वरवंट्याने विनोद घुगरे याच्या डोक्यावर प्राणघातक वार केले. गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती समजताच शहापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अधिक तपास पोलीस निरीक्षक सचिन सुर्यवंशी करीत आहेत.