Spread the love

विशेष प्रतिनिधी /महान कार्य वृत्तसेवा
पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी दहीहंडी मानली जात असलेल्या राहुल आवाडे युवा सेनेच्या दहीहंडी सोहळ्याची जयत तयारी सुरू आहे. केएटीपीच्या मैदानावरती होत असलेल्या या दहीहंडीच्या नियोजनाचे नेतृत्व युवक नेते राजू बोंद्रे करत आहेत. भर पावसातही ते कार्यक्रमास्थळी कार्यकर्त्यांना नियोजनाच्या सूचना देत सोहळा उत्साहात पार पाडण्यासाठी धडपडत आहेत.
त्यांच्यासोबत दीपक सुर्वे, नितेश पोवार, सतीश उर्फ बंडू मुळीक, इम्रान मकानदार व नाना पाटील परिश्रम घेत आहेत.
राहुल आवाडे युवा सेनेच्या वतीने दरवर्षी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले जाते यंदाही तब्बल 3 लाख 11 हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. या निमित्ताने रंगीबेरंगी फटाक्यांच्या आतषबाजीचा शो, रिल्स आणि बरेच काही दहीहंडीला उत्साह भरणारे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी राजू बेंद्रे गेली महिन्याभरांपासून नियोजनात व्यस्त आहेत. हा ऐतिहासिक क्षण डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी इचलकरंजीकरजी आसुसलेले आहेत. सोमवारी सायंकाळी या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. यासाठी मोठ्या संख्येने दहीहंडी मंडळांनी नोंदणी केल्याचे बोंद्रे यांनी सांगितले. तसेच या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन ही बोंद्रे यांनी केल आहे.