Spread the love

तारदाळ / महान कार्य वृत्तसेवा
तारदाळ गावाच्या पूर्व बाजूस असणाऱ्या मगदूम मळ्यात रविवारी पहाटे दोनच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत शितल राजाराम मगदूम यांच्या घरात घुसून तिजोरीतील सोन्याची अंगठी ,पाटल्या , कर्णफुले , चेन असा अंदाजे ८ ते १० तोळे सोने व रोख रक्कम अंदाजे ७० हजार रुपये लंपास केले .तसेच शेजारीच असणाऱ्या प्रकाश मगदूम यांच्याही घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दिड ते दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने तसेच दहा ते पंधरा हजार रोख रक्कम व ३० हजार रुपये किमतीचा स्मार्ट फोन चोरांनी लंपास केले आहे.  या घटनेने या परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तारदाळ येथील मगदूम मळा परिसरात मोठी लोकवस्ती आहे .या परिसरातच शितल मगदूम हे आपल्या कुटुंबीयासमवेत राहतात.रविवारी पहाटे मगदूम कुटुंबीय गाढ झोपेत असताना अज्ञात चोरांनी मुख्य दरवाजातून घरात घुसून तिजोरी फोडून त्यामध्ये असणारे दागिने व रोख रक्कम असा एकूण अंदाजे दहा लाखाचा ऐवज लंपास केला आहे.तसेच शेजारी असणाऱ्या प्रकाश मगदूम यांच्या घरात देखील मुख्य दरवाजातून चोरांनी आत घुसून महिलेच्या गळ्यातील दागिने व रोख रक्कम असा एकूण अंदाजे दोन लाखाचा ऐवज चोरांनी लंपास केला आहे.
घटनास्थळी शहापूर पोलिसांनी पहाटे भेट देऊन घटनेची पाहणी केली. सदरचा दरोडा हा गेली महिनाभर टेहळणी करून दहा ते पंधरा अज्ञात चोरांनी घातला असावा अशी चर्चा घटनास्थळी नागरिकांतून सुरू होती .