Spread the love

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा

मेफेड्रोन (एम.डी) हा अंमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपातील संशयित आकाश रमेश माने यास शहापूर पोलिसांनी २३ जुलै २०२५ रोजी अटक केली होती. न्यायालयीन कोठडीत रवानगी झाले नंतर त्याच्या वतीने अॅड मेहबूब बाणदार यांनी सत्र न्यायालय इचलकरंजी (मा. गांधी सो) यांचे न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. संशयित आकाश कडून काहीही जप्त नाही. एन.डी.पी.एस. कायदेच्या कलम ५० च्या तरतुदींचे पालन केलेले नाही, इतर आरोपींनी सदर संशयितांचे नाव घेतले यास भारतीय पुरावा कायदा कलम २५ ची बाधा येते. हा युक्तिवाद संशयितांच्या वतीने अॅड मेहबूब बाणदार यांनी मांडला त्या समर्थनात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे अलीकडचे न्यायनिवाडे सादर केले. सदर युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयाने संशयित आकाश माने याचा रक्कम रु 1 लाख इतक्या जामिनावर सशर्त जामीन मंजूर केला. सदर कामी अॅड मेहबूब बाणदार यांना अॅड बोहरा, अॅड शीतल शीरढोणे, अॅड अश्पाक देसाई यांनी सहाय्य केले.