Spread the love

विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग ; देशभक्तीने वातावरण दुमदुमले

यड्राव / महान कार्य वृत्तसेवा

79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर यड्राव येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानाचे औचित्य साधून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये शेकडो विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ व विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. भारतमातेच्या जयघोषांनी संपूर्ण गाव दुमदुमून गेला होता. हातात राष्ट्रध्वज घेतलेले विद्यार्थी, लहानग्यांचे पथक, देशभक्तिपर गाणी, घोषणांनी गावाचा प्रत्येक कोपरा राष्ट्रप्रेमाने न्हालेला दिसून आला.

यावेळी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर म्हणाले, स्वातंत्र्य दिन हा केवळ उत्सव नसून, आपल्या राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना अभिवादन करावं. देशाबद्दल असणारे प्रेम हे सर्वांसमोर आलं पाहिजे. याकरिता आज हे तिरंगा रॅली काढण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दोन महिलांनी अधीकारी याचे नेतृत्वखाली पहलगामा हल्ल्यातील शहीद झालेल्या व्यक्तींना खऱ्या अर्थाने सिंदूर मिशनच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहिली आहे. असे सांगत सर्वांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानात भाग घ्यावा, असे आवाहन केले.

रॅलीदरम्यान “भारत माता की जय”, “वंदे मातरम”, “हिंदुस्थान जिंदाबाद” अशा देशभक्तिपर घोषणा देत युवक व विद्यार्थ्यांनी परिसरात जोश निर्माण केला.

यावेळी शहापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सूर्यवंशी, शशिकांत ढोणे, ग्रामपंचायत सदस्य हरीश नाईक, पोलीस पाटील जगदीश संपकाळ, औरंग शेख, मिथून बिरंजे, विकास कोकाटे, अभिजीत प्रभाकर, राजाराम माने, सदाशिव कोरवी, विनोद माने, रमेश पाटील, रणजीत उपाध्ये, केशव धुमाळे, दीपक झुटाळ, प्रवीण निमिष्टे, संभाजी निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

कुमार व कन्या विद्या मंदिर, दि न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी रॅलीत सहभागी झाले होते. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत राष्ट्रभक्तीची भावना रुजवण्याचा या रॅलीचा उद्देश होता, जो यशस्वीपणे साध्य झाला.ग्रामस्थांनी या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देत, “हर घर तिरंगा” मोहिमेस पाठिंबा दिला. गावात एकतेचे, राष्ट्रप्रेमाचे व सकारात्मकतेचे वातावरण पाहायला मिळाले.