Spread the love

हातकणंगले पोलीसांची कारवाई

हातकणंगले विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे गांजाच्या शेतात धाड टाकून 8 किलो 833 ग्रॅमचा अंदाजे किंमत्त 1 लाख 32 हजार 495 रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला असून संशयित शेतकरी सुनिल वसंत देसाई वय 60 यास हातकणंगले पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरीक्षक शरद मेमाने यांच्या मागदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पवार यांनी ही कारवाई केली.

याबाबात अधिक माहिती अशी, हिंगणगाव येथील शेतकरी सुनिल वसंत देसाई यांनी गट नंबर 35 अ, मध्ये गांजाची लागवड केल्याची माहिती पीएसआय पवार यांना मिळाली होती. यानंतर पोलीस निरिक्षक शरद मेमाने यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. आणि दुपारच्या सुमारस ही कारवाई करण्यात आली.