Spread the love

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
जिव्हाजी सहकारी बँकेला आमचे सभासदत्व रद्द करण्यासंदर्भातील काेणताही सबळ पुरावा विभागीय सहनिबंधकसाे सहकारी संस्था काेल्हापूर यांचेकडे सादर करता आला नाही. त्यामुळे सहकारी संस्था कलम 35 अन्वये आमचे सभासदत्व कायम असल्याचा निर्णय विभागीय सहनिबंधकांनी दिला असल्याची माहिती दिलीप ढाेकळे, मुकुंद बडे, विजय काेळेकर व गाेवर्धन बडवे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
दरम्यान, बँकेने 2023-24 च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हेतुपुरस्सर ठराव मंजूर केला. तसेच जाणीवपूर्वक खाेटे आराेप करुन आमची बदनामी करण्याचा प्रकार केल्याने जिव्हाजी बँकेसह ठराव सादर करणारे सुचक संजय कार्वेकर व अनुमाेदक दत्तात्रय बेलेकर यांच्या विरुध्द अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती दिली आहे.
पत्रकात, वार्षिक सभेच्या अनुषंगाने वार्षिक अहवालानुसार सभासदांना समजणेसाठी आम्ही कांही प्रश्न उपस्थित करुन त्याची माहिती बँकेकडे मागितली हाेती. सदरचे प्रश्न उपस्थित केल्यामुळे बँकेतील कांही बाेटावर माेजण्याइतक्या कारभाèयांचा प्रकार व बँकेचे हाेणारे नुकसान उजेडात येणार हाेते. परंतु, बँकेने आम्हा चार सभादांविरुध्द प्रश्न उपस्थित केले, तसेच साळी समाज बांधव व्हाॅटस्अप ग्रुपवर संस्थेची बदनामी केल्याचा आराेप केला. आणि 24 ऑगस्ट
2024 राेजी संस्थेच्या वार्षिक सभेत आम्हां चाैघांचे सभासदत्व रद्द करण्याचा ठराव ऐनवेळचा विषयामध्ये बँकेच्या कारभाèयांच्या सुचना व दिलेल्या चिठ्ठीनुसार सुचक म्हणून संजय कार्वेकर यांनी वाचून दाखविला. त्यास दत्तात्रय बेलेकर यांनी अनुमाेदन दिले. आणि ताे ठराव मंजूर केला हाेता.
वास्तविक सभासदत्व रद्दची कारवाई करताना त्याची पूर्वकल्पना अथवा नाेटीस संबंधितांना देणे आवश्यक हाेते. मात्र ती दिली नाही. त्याचबराेबर संचालक मंडळ मिटींगमध्ये पहिल्यांदा ठराव पास न करता वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये ऐनवेळच्या विषयामध्ये विषय घेतला, याची पूर्व कल्पना विभागीय सहनिबंधकसाे सहकारी संस्था काेल्हापूर यांनाही कळिवली गेली नाही. आमचे सभासद काेणत्या कारणासाठी रद्द केले याची माहिती विभागीय सहनिबंधक यांचेकडे मागणी केली हाेती. त्यावर विभागीय सहनिबंधक व जिल्हा उपनिबंधकांनी त्यांचे पत्रात आमचे सभासद रद्द करण्याबाबत काेणताही सबळ पुरावा बँकेला देता आला नाही. शिवाय वार्षिक सभेत ऐनवेळचे विषयामध्ये हेतूपुरःस्सर विषय घेवून जाणीवपूर्वक खाेटे आराेप करण्यात आल्याचे म्हटले आहे. प्रश्न विचारणे हा सभासदांचा हक्क असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विभागीय उपनिबंधकांनी आमचे सभासदत्व व हक्क कायम ठेवल्याचे पत्रकात म्हटले आहे.