भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे हातकणंगलेकर आक्रमक : आरोग्य अधिकाऱ्यांना घातला गेला
हातकणंगले विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
भटक्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे त्रस्त झालेल्या हातकणंगले करांनी सोमवारी नगरपंचायतीवर मोर्चा काढून आरोग्य अधिकारी आसावरी सुतार यांना घेराव घातला. भटक्या कुत्र्यांचा ताबडतोब बंदोबस्त न केल्यास स्वातंत्र्यदिनी नगरपंचायतीमध्ये कुत्री आणून सोडण्याचा इशारा दिला. यावेळी आक्रमक ग्रामस्थांमुळे नगरपंचायतीमध्ये वातावरण तणावपूर्ण झाले होते.
मागील दहा दिवसांमध्ये पंधरा ते वीस जणांना भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून लचके तोडले काही जनावरांचा फरशा पडलाय त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे गल्लोगल्ली भटक्या कुत्र्यांचे कळपच्या कळप वावरत असतात त्यामुळे लहान मुलं महिला वृद्ध जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून येजा करतात या संदर्भात नगरपंचायतीला वारंवार सूचना करूनही काडीचाही फरक न झाल्यामुळे सोमवारी ग्रामस्थ आक्रमक झाले नगरपंचायती वरती मोर्चा काढला प्रचंड घोषणाबाजी करीत अधिकाऱ्यांना भंडावून सोडले यावेळी भांबावलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला निविदा काढलेली आहे परंतु टेंडर कुणीच भरलेले नाही त्यामुळे अडचण येत असल्याची त्यांनी सांगितले यावर संबंधित ठेकेदार ला आरोग्य अधिकाऱ्यांच्या फोनवरूनच ग्रामस्थांनी संपर्क साधला यावेळी संबंधित ठेकेदाराने मागील वेळी चे बिल दिलेले नाही त्यामुळे मी निविदा भरणार नाही असे सांगितल्यामुळे ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले होते.
दरम्यान काही ज्येष्ठ नागरिकांनी ग्रामस्थांची समजूत काढत आंदोलन स्थगित करण्यात भाग पाडले त्यानंतर स्वातंत्र्य दिनापर्यंत कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास भटकी कुत्री नगरपंचायतीत आणून सोडली जातील असा कणखर इशारा ग्रामस्थांनी दिला.
