हातकणंगले विशेष प्रतिनिधी / महान कार्य
हणबर समाज उन्नती संस्था यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श पुरस्कार वितरण समारंभ रविवार २४ रोजी सकाळी १०.०० वाजता अहिल्या मल्टीपर्पज हॉल, अतिग्रे, इचलकरंजी–कोल्हापूर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरविंद खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते तात्या हांडे, संयम हुक्कीरे, तालुकाध्यक्ष अजित कोणे उपस्थित होते.
खासदार धैर्यशील माने, आमदार डॉक्टर अशोकराव माने, यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. डॉ. दादासाहेब शिरगावे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार आहे. असे तात्या हांडे यांनी सांगितले.
कविवर्य वसंतकुमार हुकीरे आदर्श समाजभूषण पुरस्कार – मा. कृष्णात पिंगळेसो (ॲडिशनल एस.पी.), वीरमाता काशीबाई हणबर पुरस्कार – शालन शामराव खोत यांना जाहीर करण्यात आला आहे.
कार्यक्रमास इचलकरंजीचे माजी नगरसेवक बाळासाहेब कलागते, डॉ. गंगाधर व्हसकुटे, आय.एस. पाटील, सुरेश मुसळे, शामराव खोत, लक्ष्मण नवलाई, चंद्रशेखर पाटील, आप्पासाहेब कलागते, सुरेश खोत, सचिन खोत, रामचंद्र येमिटकर, बाजीराव खोत, सनी हणबर, शशिकांत नाईक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सर्व हणबर बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन संस्थेच्या वतीने केले आहे.
