Spread the love

नवी दिल्ली / महान कार्य वृत्तसेवा

सोमवारी दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांनी जोरदार गोंधळ घालण्यास सुरुवात केली, त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय. मतदार यादीच्या मुद्द्‌‍यावरून सुरू असलेल्या वादावरून विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली. विरोधकांच्या गदारोळामुळे लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलंय. दुसरीकडे मतदानात गैरव्यवहाराच्या आरोपांविरोधात विरोधी पक्ष असलेल्या इंडिया आघाडीच्या खासदारांनी सोमवारी मोर्चा काढलाय. या दरम्यान, लोकसभा आणि राज्यसभेचे सुमारे 300 विरोधी खासदार संसदेपासून निवडणूक सभागृहापर्यंत मोर्च्यात सहभागी झालेत. विशेष म्हणजे इंडिया आघाडीनं काढलेला मोर्चा संसदेच्या काही अंतरावर पोलिसांनी अडवला असून, आंदोलकांनी बॅरिकेड्सवर चढण्याचा प्रयत्न केलाय. राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत मोर्चात सहभागी झाले आहेत.

निवडणूक आयोगाने चांगले काम केले : जेडीयूचे खासदार संजय कुमार झा एसआयआरच्या मुद्द्‌‍यावर म्हणाले की, ‘बिहारमध्ये एसआयआर होत आहे. बिहारमधील लोकांना याबद्दल काहीही अडचण नाही, कोणताही मुद्दाच नसल्यानं हे (विरोधी पक्ष) लोक इथे गोंधळ का घालत आहेत. बिहारमधील लोक आनंदी आहेत, निवडणूक आयोगाने चांगले काम केले आहे.’ तर दुसरीकडे समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव म्हणाले की, ‘निवडणूक आयोगाकडे बोटे दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. समाजवादी पक्षाने अनेक वेळा निवडणूक प्रक्रियेतील अनियमिततेवर बोट ठेवले आहे. साध्या वेशात मतदान केंद्रांवर पोलीस उपस्थित होते आणि भाजपाच्या बाजूने जास्तीत जास्त मते पडावीत, यासाठी ते काम करीत होते.’

संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा : तसेच निवडणुकीतील गोंधळाच्या आरोपांवरून संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत काढलेल्या विरोधी पक्षांच्या खासदारांच्या मोर्च्यावर भाजपा खासदार जगदंबिका पाल म्हणाल्या, ‘ते पहिल्या दिवसापासूनच सभागृहाचे कामकाज चालू देत नाहीत. राहुल गांधी निवडणूक आयोगावर करीत असलेल्या आरोपांवर निवडणूक आयोग पुरावे मागत आहे, जर तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते दाखवा. तेजस्वी यादव यांच्याकडे स्वत: 2 एझ्घ्णब कार्ड आहेत. लोकांच्या कल्याणासाठी असलेल्या योजनांवर चर्चा झाली पाहिजे.’

मोर्चात राज्यसभेचे 300 खासदार सहभागी : इंडिया आघाडीचे खासदार हे विरोधी पक्षनेते असलेल्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा काढलाय. विरोधी पक्षाचे खासदार संसद भवनापासून निवडणूक आयोगापर्यंत काढलेल्या मोर्चात सहभागी झालेत. या विरोधी मोर्चात 300 खासदार सहभागी झालेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी या मोर्चात सहभागी झालेत. याशिवाय राजद, द्रमुक, डाव्या पक्षासह 25 हून अधिक पक्षांचे लोकसभा आणि राज्यसभेचे 300 खासदार सहभागी आहेत. काँग्रेस नेते दानिश अली म्हणाले, ‘विरोधी पक्षाच्या खासदारांचा निषेध मोर्चा संसद भवनाच्या मकरद्वार येथून सकाळी 11:30 वाजता परिवहन भवनमार्गे निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत जाईल.’ विरोधी पक्षाच्या खासदारांच्या या मोर्चानंतर आता भाजपाही आक्रमक झालीय. राहुल गांधी केवळ राजकीय स्टंटबाजी करीत आहेत. राहुल गांधी बिहारमधील लोकांचे हक्क बांगलादेशींना देऊ इच्छितात. एसआयआरच्या मुद्द्‌‍यावर राहुल गांधींना समाजवादी पक्षाचा सर्वात मोठा पाठिंबा मिळाला आहे, असंही भाजपानं आरोप केलाय.