ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांची आवाहन : राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाठार येथे बैठक
कोल्हापूर विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
कोल्हापूर जिल्ह्यातून निघणाऱ्या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचे तसेच "११ ऑगस्ट रोजी तावडे हॉटेल येथे होणाऱ्या राज्यव्यापी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाठार येथे ठाकरे सेनेची बैठक पार पडली या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केले.
उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली रविवार दिनांक १० पासून या "शेतकरी कर्जमुक्ती दिंडी"ची चंदगड विधानसभा मतदारसंघातून सुरुवात होत असून बुधवार १3 रोजी सकाळी ८:३० वाजता पन्हाळा येथून या शेतकरी कर्जमुक्ती दिंडीचे आगमन पन्हाळा-शाहूवाडी आणि हातकणंगले विधानसभा मतदारसंघांमध्ये होणार असून या दोन्ही विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहान यावेळी सर्वच वक्त्यांनी केले.
तसेच राज्य शासनाच्या विरोधात सोमवार ११ रोजी सकाळी ११:०० वाजता तावडे हॉटेल कोल्हापूर या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनास देखील सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांनी केले.
झालेल्या बैठकीस उपजिल्हाप्रमुख साताप्पा भवान, तालुकाप्रमुख बाजीराव पाटील, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका सुवर्णाताई धनवडे, उपतालुका संघटिका मालतीताई खोपडे, पेठवडगाव शहरप्रमुख संदीप पाटील, संदीप दबडे, उदयसिंह शिंदे, सागर डोंगरे, चंद्रकांत जामदार, सागर चोपडे, काकासो पाटील, दीपक वासुदेव, श्रीकांत निकम, भानुदास पाटील, सूर्यकांत पाटील, गोविंद खोत, लालासो माने, अमोल मोहिते, रोहन शृंगार, दत्ता गायकवाड, संतोष भोसले, बाळासो जाधव, संजय वाईंगडे , अमर पाटील, योगेश दबडे यांच्यासह इतर पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.