इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल इचलकरंजी शाहू सभागृहामध्ये शिवरायांचे १२ गड किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट केल्याबद्दल शालेय स्तरावर भव्य चित्रकला स्पर्धा संपन्न झाल्या. त्याचा बक्षीस वितरण व इ.10वी मार्च 2025 परीक्षा गुणवंत विद्यार्थी सत्कार प्रमुख पाहुणे विकास खारगे अप्पर मुख्य सचिव महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते संपन्न झाला .
यावेळी प्रांताधिकारी दीपक शिंदे साहेब ,महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे मॅडम,प्रशासनाधिकारी इरफान पटेल, मुख्याध्यापक शंकर पोवार ,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष वसंत सपकाळे, राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी विकास मंच अध्यक्ष सुनीर मांगलेकर , खजिनदार राजू नदाफ,निमणकर उपस्थित होते, स्वागत व प्रास्ताविक शंकर पोवार मुख्याध्यापक यांनी केले.
यानंतर विकास खारगे यांची महाराष्ट्र राज्याच्या अप्पर मुख्य सचिव पदी निवड झालेबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रमुख पाहुणे विकास खारगे यांनी मार्गदर्शन केले.यामध्ये 12गड किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत समावेश कसा करण्यात आला.तसेच राज्यगीतातील दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा या ओळीत असणारी प्रेरणा समाजातून दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राजू नदाफ यांनी तर सूत्रसंचालन पी.ए. पाटील यांनी केले.
या वेळी माजी विद्यार्थी संघाचे नीळकंठ गोसावी, महेश खांडेकर ,विजय हावळ,बसवराज कोटगी, श्रीहरी कामत,दयानंद लिपारे,जाफर जिडगे,सुभाष कुराडे , नेताजी बिरंजे सरकारी वकील संजीव नदाफ, शैला गायकवाड,गीता वाढवली, रमेश धोत्रे, मुकुंद तारळेकर ,अनिल पाटील , पांडुरंग डंबाळ,प्रमोद उदाते इ, व विकास मंचचे सर्व पदाधिकारी ,पत्रकार मित्र शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
