इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
श्री पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ, इचलकरंजी यांच्या वतीने अंगारकी संकष्टीच्या निमित्त पंचगंगा नदीच्या तीरावर वसलेल्या श्री पंचगंगा वरद विनायक मंदिर येथे धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या सकाळी ८ वाजता नित्य आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर सकाळी ८:३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत अथर्व शीर्ष व इचलकरंजी परिसरातील महिला भजनी मंडळांकडून भजन सेवा सादर केली जाणार आहे. या माध्यमातून भक्तगणांना पारंपरिक भक्तिसंगीताचा अनुभव घेता येणार आहे.
सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत उपवास पदार्थ वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी ७ वाजता नित्य आरती होईल. त्यानंतर रात्री ९ वाजून १३ मिनिटांनी संकष्टी चंद्रोदयाच्या शुभक्षणी महाआरती होणार आहे. यंदाचा अंगारकी संकष्टीचा सोहळा विशेष भक्तिभावाने साजरा होणार असून श्रद्धा,भक्ती आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देणारा हा सोहळा भाविकांसाठी अध्यात्मिक उन्नतीचा मार्ग ठरणार आहे,अशी माहिती मंदिर भक्त मंडळाने दिली.
