इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
२३ मार्च २०१९ रोजी संशयित आरोपी रमेश गायकवाड याने त्याची पत्नीसोबत जेवणावरुन व किरकोळ घरगुती वादावरुन झालेलया भांडणातुन त्याची पत्नीने आरोपीस शिवीगाळ करून मंगळसुत्र आरोपीच्या अंगावर फेकुन घर सोडून कुरुंदवाड येथील बस स्टॅण्डवर निघुन गेली असता तिचा पाठलाग करून झालेलया भांडणाचा राग मनात धरुन भर दिवसा गर्दीच्या ठिकाणी आरोपी रमेश गायकवाड याने त्याच्या पत्नीचा दोरीने गळा आवळुन तिचा खुन केला. तसेच आरोपी रमेश गायकवाड हा कुरूंदवाड पोलिस ठाणे येथे हजर होवुन सदरचा खुन केलेचा गुन्हा स्वतः कबुल केला होता. सदरचा गुन्हयाबाबत कुरुंडवाड येथील पोलिस ठाणेमध्ये आरोपी विरुध्द खुनाचा गुन्हा नोंद करणेत आला होता. सदर गुन्हयात जयसिंगपुर येथील जिल्हा व सत्र न्यायालय यांनी दि. ३० एप्रिल २०२४ रोजी आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली होती.
सदर शिक्षे विरुध्द आरोपीच्या वतीने अॅड. सचिन यशवंतराव माने यांनी ना. उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडे शिक्षेविरुध्द अपील दाखल केले होते. ना. उच्च न्यायालय, मुंबई यांचेकडील अपीलचे कामी जामिन अर्जावरील सुनावणी दरम्यान प्रथमदर्शनी आरोपीचे पत्नीने त्यास शिवीगाळ करून मंगळसुत्र तोडून त्याच्या अंगावर फेकलेने आरोपी हा गुन्हा करणेस प्रवृत्त झालेचे दिसते तसेच आरोपीने केलेले कृत्य हे भा. द. वि.सं.चे कलम ३०२ चे व्याख्येत येत नाही, आरोपीने जरी सदर गुन्हयात स्वतः गुन्हयाची कबुली देवुन फिर्याद दिली असली तरी आरोपीने दिलेला पोलिसांसमोरील कबुली जबाब हा भारतीय पुरावा कायदयाप्रमाणे सिध्द होत नाही तसेच आरोपीने इतर साक्षीदारांसमोर दिलेला कबुली जबाब हा शिक्षा देणेस सबळ पुरावा असु शकत नाही असा युक्तीवाद करणेत आला. सदर युक्तीवाद ग्राहय मानुन ना. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रमेश गायकवाड यास जामिनावर खुले करणेचा आदेश पारित केला. आरोपी तर्फे अॅड. केदार पाटील (मुंबई), अॅड. सचिन माने, अॅड. प्रतिक टारे, अॅड. साक्षी कदम यांनी काम पाहिले.
