Spread the love

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
श्री नामदेव समाज सेवा मंडळ , आरोग्य अधिकारी डॉ. सॅमसन घाटगे यांच्या संयुक्तविद्यमाने मोफत रक्त तपासणी शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला.
श्री नामदेव भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात
रक्तगट – हिमोग्लोबिन – शुगर तपासणी करण्यात आली. तसेच वय वर्ष ७० पूर्ण झालेल्या नागरिकांना रु ५ लाखपर्यंत मोफत उपचार कार्डची नोंदणी देखील करण्यात आली. या शिबिराचा सुमारे १५० नागरिकांनी लाभ घेतला. तालुका आरोग्य अधिकारी प्रसाद दातार यांच्या मान्यतेने प्राथमिक आरोग्य केंद्र गावभाग येथील इन्चार्ज श्रीदेवी शेलार यांच्या सोबत सर्व आशा वर्कर नर्सिंग स्टाफ यांनी काम पाहिले शिबिर यशस्वीतीसाठी संत नामदेव समाजसेवा मंडळ युवक संघटना आणि महिला मंडळ यांनी परिश्रम घेतले