इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
कबनूर येथील खंडणी प्रकरणात अटकेत असणारा जर्मन गॅंगचा म्होरक्या शुभम पट्टणकुडे उर्फ याला जामिनावर मुक्त केले. या प्रकरणी ॲड.संग्राम नरंदेकर यांनी काम पाहिले.
याबाबतची हकीकत अशी कबनूर गावचे सामाजिक कार्यकर्ते हुसेन मुजावर याच्याकडे 5 लाख रुपयाची खडणी मागून खुनाची धमकी देऊन व तसेच एका आरोपीच्या जामीनसाठी 30000हजार रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी हुसेन मुजावर यांनी 6 जुलै 2025 रोजी शिवाजी नगर पोलीस स्टेशन इचलकरंजी येथे पट्टणकुडे व अन्य तीन साथीदारविरुध्द गुन्हा दाखल केला होता. तरी जामीनास सरकारी वकील यांनी कडाडून विरोध केला होता. त्यानन्तर ॲड. संग्राम नरंदेकर यांनी सुप्रीम कोर्टाचा न्याय निवडा सादर करून आरोपीस चुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे. आरोपीस लावलेले भारतीय न्याय संहिता चे कलम लागूच शकत नाही असा युक्तिवाद केला. मा.न्यायालयांनी ॲड. संग्राम नरंदेकर यांचा युक्तिवाद ग्राह्य मानून आरोपी यास जामीन मंजूर केला.
