आळते / महान कार्य वृत्तसेवा
मंत्री हसन मुश्रीफ यांनी वनतारासाठी आळते गावचे नाव सुचवले आहे . त्याचे गावच्या ग्रामस्थांच्या वतीने स्वागतच आहे . आळतेच्या जंगलामध्ये महादेवी हत्तीच्या सेवेसाठी ग्रामस्थांच्या व ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल . अशी ग्वाही सरपंच इंगवले यांनी दिली आहे.
नांदणी (ता. शिरोळ) येथील महादेवी (माधुरी) हत्तीण पुन्हा नांदणी मठामध्ये परतण्याची आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य शासन , पेटा , वनतारा संस्था , व नांदणी मठाच्या वतीने न्यायालयीन प्रक्रिया संयुक्तपणे सुरू केली आहे . वनताराचे प्रमुख अनंत अंबानी यांनी महादेवी हत्तीण परत आणण्यासाठी वनतारा पूर्णपणे नांदणी मठासोबत आहे . न्यायालयाच्या आदेशानुसार महादेवीच्या सुरक्षेसाठी व तिच्या उत्तम प्रकृतीसाठी आवश्यक ती सर्व तांत्रिक व वैद्यकीय मदत देण्यास आमचे प्रथम प्राधान्य राहील . तसेच सर्वतोपरी मदत करण्याचे अभिवचन त्यांनी दिले आहे.
वनचाराच्या अभिवचनानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी महादेवी हत्तीनीच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हा स्वाभिमानाने पेटला तर काय घडू शकते याची प्रचिती आली आहे . तसेच वनतारा संस्थेने हातकणंगले तालुक्यातील आळते येथील जंगल घेऊन वनचारा फेज दोन करावे असे आवाहन केले आहे.
