Spread the love

इचलकरंजी विशेष प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

सफाई कामगारांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठीची २५ वर्ष सेवा होणे आवश्यक अशी अट आहे. ती सेवेची अट १५ वर्षे व्हावी यासाठी  सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ  यांनी माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.

महापालिका सफाई कामगारांचे अस्थापनावरील संख्या ७५० इतकी आहे. एवढीच कामगार डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य घरकुल योजनेत बसतात २५ वर्षे सेवा अटी परिपत्रकाप्रमाणे फक्त १५० ते २०० सफाई कामगार या योजनेचा फायदा घेऊ शकतात. त्यांनाच मोफत मालकी हक्काने घरी मिळू शकतात.

सन २०२३ ला लाड, पागे समितीच्या शिफारशीनुसार सफाई कामगाराने १५ वर्षे सेवा झालेल्या सफाई कामगारांना स्वेच्छा निवृत्ती घेता येते. त्यामुळे बऱ्याच सफाई कामगारांनी १५ ते २० वर्ष सेवा झाल्यानंतर स्वेच्छा निवृत्ती दिली आहे. सर्व सफाई कामगारांना जर मोफत मालकी हक्काने घरकुल मिळण्यासाठी २५ वर्षाची सेवेची अट रद्द करून १५ वर्षे सेवेची अट झाल्यास सर्व सफाई कामगारांना मोफत मालकी हक्काचे घरे मिळणार आहेत. अशा आशयाचे निवेदन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट व राज्यमंत्री माधुरीताई मिस्साळ, खासदार धैर्यशील माने, आ.डॉ. राहुल आवाडे,  प्रकाशआवाडे,  सुरेशराव हाळवणकर, जिल्हाप्रमुख शिवसेना रविंद्र माने यांना देण्यात आले.

त्यावेळेस दादू हेगडे, श्रीकांत टेके, अमोल कवीशील उपस्थित होते.