Spread the love

रायगड / महान कार्य वृत्तसेवा

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्‌‍यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. यामुळं वाहनचालकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत होता. मात्र आता या खड्ड्‌‍यांवर उपाययोजना म्हणून महाराष्ट्रात प्रथमच ‘इकोफिक्स’ या विशेष मटेरिअलचा वापर करुन खड्डे बुजवले जाणार आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे बुजवण्यासाठी आता पारंपरिक पद्धतीला फाटा देत ‘इकोफिक्स’ या नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात येणार आहे. हे मटेरिअल पोलाद उत्पादनातील वेस्ट मटेरिअलपासून तयार केलं असून रोड सर्च इन्स्टिट्यूटकडून त्याचं संशोधन करण्यात आलं आहे.

मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसलेंच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक : इकोफिक्स मटेरिअलचा वापर केल्यानं खड्डे अधिक मजबूत आणि पॅचवर्क दीर्घकाळ टिकणाऱ्या पद्धतीनं बुजवता येणार आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात प्रथमच इकोफिक्सचा वापर या महामार्गावर होत असून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत याचं प्रात्यक्षिक सादर केलं जाणार आहे. सेंटर रोड रिसर्चचे प्रोफेसर सतीष पांडे हे स्वत: इकोफिक्सचा उपयोग कसा केला जातो, याचं सविस्तर प्रात्यक्षिक दाखवणार आहेत.

नागरिकांमध्ये संतापाची भावना : मुंबई-गोवा महामार्गाचं काम गेल्या 17 वर्षांपासून सुरू आहे, पण अजूनही ते पूर्ण झालेले नाही. पावसाळ्यामुळे या कामात अजून दिरंगाई झाली आहे. महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्यानं प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे आणि याबद्दल नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. सर्व्‌ि‍हस रोड मोठ्या खड्ड्‌‍यांनी पोखरला : महामार्गावरील काँक्रिटचं काम काही ठिकाणी पूर्ण झालं असलं, तरी रायगड जिल्ह्यातील माणगाव, इंदापूर बायपास, कोलाड, लोणेरे, पुई आणि खांब या महत्त्वाच्या ठिकाणी पूल आणि बायपासचं काम आजही अपूर्ण आहे. काही ठिकाणी काम सुरू असतानादेखील रस्त्याच्या कडेला बनवण्यात आलेले सर्व्‌ि‍हस रोड मोठ्या खड्ड्‌‍यांनी पोखरले आहेत. पावसाळ्यात या खड्ड्‌‍यांमुळं वाहनचालकांचा संताप उफाळून येतोय. दररोज अपघातांची शक्यता वाढत आहे. वाहतूक कोंडी, वाहनांचं नुकसान आणि प्रवाशांचा वेळ वाया जाणं ही या रस्त्याच्या दुर्दशेची मोठी उदाहरणं आहेत.