Spread the love

इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा

वयात येताना होणारे शारीरिक ,मानसिक बदल यांच्याकडे शास्त्रशुद्ध दृष्टीने कसे पहावे व त्याचा अभ्यासात  व्यत्यय आणून न देता सकारात्मक दिशेने वाटचाल कशी करावी याचे विवेचन स्लाईड्स व व्हिडिओ आणि व्याख्यानाच्या माध्यमातून सांगलीचे हृदयरोग तज्ञ डॉ.अनिल मडके आणि डॉ. सौ पल्लवी अनुजे यांनी शालेय मुला- मुली करिता तारुण्याच्या उंबरठ्यावर हा लैंगिक शिक्षण आणि व्यक्तिमत्व विकास या विषयी कार्यक्रम रोटरी क्लब व रोटरी अँनस इचलकरंजी आणि जनस्वास्थ, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या व्याख्यानात ते बोलत होते.

आरोग्य विषयी टिप्स देताना डॉ. मडके म्हणाले, आहारात पालेभाज्या, प्रथिने यांचा समावेश करावा, नियमित व्यायाम, व्यसनाधीनता, पुरेशी झोप याबरोबर स्वच्छतेची काळजी याविषयी माहिती दिली .आजच्या विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तकाऐवजी वेगवेगळ्या अमली पदार्थांच्या पुड्या दिसत आहेत. सिगारेट दारू ,चरस, अफू ,गांजा यासारखे अमली पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याने लहान वयातच मुले व्यसनाच्या आहारी जात आहेत. विद्यार्थ्यांनी वेळेत सावध होऊन व्यसनापासून दूर राहावे आणि नशा मुक्त भारत निर्माण करावे असे त्यांनी सांगितले. डॉक्टर सौ पल्लवी अनुजे यांनी मुलींना मासिक पाळी, गर्भधारणा स्वच्छता पौष्टिक व प्रोटीन युक्त आहार याविषयी महत्त्वाच्या बाबी सांगितल्या तसेच मोबाईलचे दुष्परिणाम याविषयी मार्गदर्शन केले.

श्रीमंत ना.बा.घोरपडे नाट्यगृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस रोटरीचे अध्यक्ष संजय घायतिडक व रोटरी अँनसचे अध्यक्ष सौ. मेघा यळरुटे यांनी सर्वांचे स्वागत केले .कार्यक्रमाचे प्रास्ताविक व डॉ. अनिल मडके यांची ओळख अभय यळरुटे यांनी करून दिली. डॉ. पल्लवी अनुजे यांची ओळख सौ.दीपा जठार यांनी केली. प्रोजेक्ट चेअरमन मुकुंद माळी यांनी आभार मानले. कार्यक्रमावेळी रोटरीचे सेक्रेटरी राजू पाटील, डीएम कस्तुरे, नेमिनाथ कोथळे, पंकज कोठारी ,संतोष पाटील, शिवदास कित्तुरे ,शरद देसाई, सत्यनारायण धूत, सौ .शर्मिला पाटील, वर्षा  निकम यांच्यासह विविध शाळेतील शिक्षक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.