Spread the love

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा

शि.म.डॉ.बापूजी साळुंखे हायस्कूल मध्ये इ. आठवी शिष्यवृत्ती परीक्षेस 16 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 07 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झाले. यामध्ये श्वेतल सुनिल बंडगर व प्रिया शशिकांत गुरव हे राज्य गुणवत्ता यादीत अनुक्रमे 8 व्या व 16 व्या क्रमांकाने तर ईकरा फजलेकरीम मुजावर ही जिल्हा गुणवत्ता यादीत 51 व्या क्रमांकाने शिष्यवृत्ती धारक बनले. सर्व विध्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक बंधू, भगिनी यांचे मार्गदर्शन लाभले.