इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
श्री नामदेव समाज सेवा मंडळ , आरोग्य अधिकारी डॉ. सॅमसन घाटगे यांच्या संयुक्तविद्यमाने बुधवार दि. ०६ ऑगस्ट रोजी सकाळी १०. ०० ते १२. ०० यावेळेत मोफत रक्त तपासणी शिबिर श्री नामदेव भवन येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरामद्धे रक्तगट – हिमोग्लोबिन – शुगर तपासणी होणार आहे. तसेच वय वर्ष ७० पूर्ण झालेल्या नागरिकांना रु ५ .०० लाखपर्यंत मोफत उपचार कार्डची नोंदणी होणार आहे. तरी या शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन
श्री नामदेव समाज सेवा मंडळ, इचलकरंजी यांचे वतीने करण्यात आले आहे.
