Spread the love

इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल, इचलकरंजी येथे राजर्षी शाहू महाराज विकास मंच व राजर्षी छत्रपती हायस्कूल माजी विद्यार्थी संघ यांच्या संयुक्तविद्यमाने शिवरायांचे १२ गड किल्ले जागतिक वारसा यादीत  विकास खारगे , अप्पर मुख्य सचिव महसूल व सांस्कृतिक विभाग यांच्या प्रयत्नाने समाविष्ट झाले.त्याबद्दल विद्यार्थ्यांच्यामध्ये जागृती व्हावी व देशाभिमान निर्माण व्हावा यासाठी  शालेय स्तरावर भव्य चित्रकला स्पर्धा  सोमवार  दि. 4 ऑगस्ट रोजी मैदानावर घेण्यात आल्या . यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक शंकर पोवार, विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका सौ .अलका शेलार मॅडम, पर्यवेक्षक राजेंद्र घोडके,पी.ए्.पाटील ,राजर्षी छत्रपती शाहू महाराज विद्यार्थी विकास मंचचे अध्यक्ष सुनील मांगलेकर, खजिनदार राजू नदाफ , महेश खांडेकर,विजय हावळ,नेताजी बिरंजे, एम.ए.आयरेकर,पी.जी पाटील,कला शिक्षक निंबाळकर ,तुषार जगताप,सौ.स्नेहा आवटे, प्रेम काळे ,सई जगताप,शिवम पोवार इ.उपस्थित संपन्न झाले.