इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा
विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विकास विद्यामंदिर गणेशनगर इचलकरंजी या ठिकाणी बालरंगभूमी परिषद शाखा इचलकरंजी यांचे वतीने दोन ऑगस्ट बालनाट्य दिनानिमित्त नृत्य,अभिनय तसेच रंगभूषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी नृत्तेची देवता नटराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेस सुरुवात करण्यात आली.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष विकास चौगुले,बालरंगभूमी परिषद शाखा इचलकरंजीचे प्राध्यापक कपिल पिसे, सचिन चौधरी, रंजना घोरपडे, वर्षा चौधरी, रेश्मा कोंडेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सपना मेळवंकी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळे दरम्यान विद्यार्थ्यांना अभिनयातील नवरसांचे सादरीकरण, नाटिकेचे सादरीकरण, रंगमंचावरील वावर, नृत्य विशारद, पिंगळा सादरीकरण, मेकअप कशा पद्धतीने केला जातो याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन सुरेश मावळी यांनी केले.
