Spread the love

इचलकरंजी ब्राम्हण सभे तर्फे पुरस्कार 2025 चा वितरण सोहळा संपन्न


इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
राज्यात नव्याने स्थापन झालेल्या परशुराम आर्थिक महा मंडळातून ब्राम्हण समाजातील लोकांना व्यक्ती, व गट स्वरूपात कर्ज आणि प्रदेशात शिक्षणा साठी अर्थसहाय्य तर एकल महिला साठी विशेष योजना आणि राज्यातील समाजाचा लवकरच सर्वे केला जाणार असल्याची माहिती महा मंडळाचे अध्यक्ष कॕप्टन आशिष आनंद दामले यांनी येथें दिली.
ब्राम्हण सभा इचलकरंजी तर्फे आयोजित लो. टिळक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्ष स्थानी उद्योजक अनिल काटदरे(सातारा)हे होते. या वेळी श्रीमंत यशवंत राव घोरपडे सरकार आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे, आदी मान्यवर हजर होते.
प्रारंभी लो. टिळक व इतरांच्या प्रतिमा चे पूजन मान्यवरा च्या हस्ते झाले. वेदमूर्ती भाटवडेकर गुरुजी व दिग्विजय कुलकर्णी व इतरांनी ईशस्तवन केले. स्वागत ब्राह्मण सभा अध्यक्ष सुरेश जोशी यांनी व प्रास्ताविक उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णीं तर स्वागत विश्वस्त मुकुंद फाटक यांनी केले. यावेळी लो. टिळक पुरस्कार 2025 हा श्रीकांत प्रभुदेसाई यांना देण्यात आला. तर श्रीमंत ना. बा. घोरपडे सरकार पुरस्कार सौ. मिनल पुरषोत्तम कुलकर्णी (ज्योतिष विद्या), तुषार सुरेश कुलकर्णी (औद्योगिक),ऍड आदित्य अनिल रुईकर( साहित्य) श्रीमती वरदा हेमंत उपाध्ये (शैक्षणिक)यांचा सत्कार यशवंतराव घोरपडे यांच्या झाला, आणि वेद सम्राट कै. सखाराम पाध्ये गुरुजी वेदो नारायण पुरस्कार वेदमूर्ती ऋग्वेद घनपाटी गोपाळ विष्णू वडेर गुरुजीयांना अनिल काटदरे यांच्या हस्ते देण्यात आले. तर विजयकुमार आबासाहेब प्रभू (लोणचे पापड विक्री), मधुसूदन बळवंत पेठे (पूजा साहित्य विक्री),विठ्ठल गजानन दिवेकर (घरगुती वस्तू विक्री), श्रीपाद माधव साने (वृत पत्र विक्री),समीर गोविंद ओगले (वैरण विक्री) आणि लष्करी अधिकारी सुभेदार प्रविण विश्वास पाटील (ऑपरेशन सिंदूर मध्ये सहभाग) याचा विशेष गौरव झाला. तसेच सेवाभावी संस्था पुरस्कार माणुसकी फाउंडेशन ला देण्यात आला व गुणी विदयार्थ्यांचा सत्कार मान्यवरा च्या हस्ते झाला.
मुख्य पाहुणे दामले पुढे म्हणाले, परशुराम मंडळा ची नियमावली व कामाचे स्वरूप आणि सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता जपणे हे काम महत्व पूर्ण ठरणार आहे.महामंडळा चे कार्यालय पुणे येथे सुरू झाले असुन नाशिक व इचलकरंजी मध्ये परशुराम भवन होईल, इचलकरंजी तील भवन साठी दोन लाखाचा स्वनिधी देण्याची घोषणा ही केली. कार्यक्रमात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी ब्राम्हण सभेच्या कार्याचे कौतुक केले. तर अध्यक्ष काटदरे यांनी उपक्रमास शुभेच्छा देऊन स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. यावेळी पुरस्कारार्थीनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास विश्वस्त दिगंबर कुलकर्णी, शैलेश गोरे, पदमनाभ कुलकर्णी, कार्यकारिणीउपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, सचिव संजय मैंदर्गी, खजिनदार जयंत फडके, सदस्य सतीश फडके, संदीप जोशी, मंदार जोशी, प्रा. मिलींद दांडेकर, किरण दंडगे, दिग्विजय कुलकर्णी, मनिष आपटे तसेच उद्योगपती एस व्ही कुलकर्णी ,जवाहर साखर कारखान्याचे एमडी मनोहर जोशी, एम वाय सहस्त्रबुद्धे आदी मान्यवर हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. माधुरी केस्तीकर, डॉ, सुजित सौदंत्तीकर, यांनी तर आभार सौ अर्चना रानडे सौ.संपदा ओगले यांनी मानले, शेवटी पसायदान होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.