इचलकरंजी / महान कार्य वृत्तसेवा
श्रीपादनगर, लालनगर व माऊली चौक इचलकरंजी येथे MEPHENTERMINE SULPHATE INJECTION IP 30 MG औषधाच्या ५२ बाटल्या व रोख रक्कम अवैद्यरित्या प्राप्त करुन बेकायदेशीररित्या व वैदयकीय अधिकारी यांचे परवानगीशिवाय विक्री करणेस मनाई असणारी नशेचे इंजेक्शनच्या बॉटल विना परवाना बेकायदेशीररित्या विक्रीकरीता जवळ बाळगले प्रकरणी इचलकरंजी पोलिस ठाणे येथे सचिन मांडवकर, संग्राम पाटील, अभिषेक भिसे व विशाल घोडके यांचे विरुध्द गुन्हा नोंद करणेत आला होता. तसेच विशाल घोडके यास अटक न होता त्याने अटकपुर्व जामिन मिळकणेकरीता अर्ज दाखल केलेला होता.
आरोपी सचिन मांडवकर, संग्राम पाटील, अभिषेक भिसे व विशाल घोडके यांचेवतीने अॅड. सचिन यशवंतराव माने यांनी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामिन मिळणेकरीता अर्ज दाखल केला व सदर जामिन अर्जाचे सुनावणीवेळी मा. उच्च न्यायालयाच्या विविध न्याय निवाडयांचा आधार घेत असा युक्तीवाद केला कि, सदर प्रकरणी आरोपी विरुध्द बी.एन.एस.चे कलम १२३ हे लागु होत नाही, आरोपींकडे आढळुन आलेले नशेचे इंजेक्शन हे गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (NDPS) अंतर्गत विक्रीस प्रतिबंध नाही, तसेच वैद्यकीय सल्ल्याशिवाय जप्त केलेले इंजेक्शन बाळगणे हा जामिनपात्र स्वरुपाचा गुन्हा असुन पोलिसांनी केलेली कारवाई ही चुकीची आहे असा युक्तीवाद केला. सदर जामिन अर्जास सरकार पक्षाने जोरदार हरकत घेत सदर गुन्हयाचा तपास अजुन प्रगती पथावर असुन सदर प्रकरणी दोषारोपपत्र अद्याप दाखल झालेले नाही, आरोपीस जामिनावर मुक्त केलेस तो सरकार पक्षाचा पुरावा नष्ट करेल असा युक्तीवाद केला. परंतु आरोपी तर्फे अॅड. सचिन माने यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय मानुन इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी सचिन मांडवकर, संग्राम पाटील, अभिषेक भिसे व विशाल घोडके यांना जामिन मंजुर केला.
