यळगूड / महान कार्य वृत्तसेवा
यळगूड गावात गेल्या रविवार पासून सलग आठ दिवसात आठ जणांचा मृत्यू ( महिला आणि पुरुष ) झाल्याने गावात कामालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी लोक अनेक तर्क वितर्क लढवत आहेत. शिवाय येथील स्मशानात भीतीने गाळण उडावी, अशा प्रकारची करणी बाधा करण्यात आल्याने येथील करणीच गावात होत असलेल्या लागोपाठ मृत्यूला कारणीभूत ठरत नसेल ना ? या प्रश्नाने गावात काहूर माजवले आहे.
येथील स्मशानात कागल तालुक्यातील खेबवडे आणि शिरोळ तालुक्यातील उदगाव सारखा करणीचा प्रकार घडला आहे. येथील प्रत्येक झाडाला काळ्या बाहुल्या अडकवून त्या बाहुल्यांचा रागा रागाने खून करावा, अशी भयंकर रचना करण्यात आल्याने लोकांत मोठी भीती आहे. हा प्रकार अलीकडच्या काळात नवीनच असल्याने लोक प्रचंड दडपणात आहेत, आणि या प्रकारचा संबंध गावात सलग होणाऱ्या मृत्यूला जोडला जात आहे. त्यामुळे नेमका हा प्रकार आहे याची शहानिशा होणे गरजेचे बनले आहे. कारण भीतीच्या छायेखाली असणारे लोक अनेक तर्क वितर्कांचा काल्पनिक डोंगर उभा करत आहेत.
स्मशान लोटणारे कोण?
गावात सलग होत असलेल्या मृत्यूमुळे लोक अनेक अंदाज व्यक्त करत आहेत. तसेच अशी चर्चा आहे की रात्री साडे बारा नंतर स्मशानातील राख लोटताना दोघांना काही लोकांनी पहिल्याची चर्चा गावात सुरु आहे. त्यामुळे मध्यरात्री स्मशानातील मेलेल्या मढ्याची राख लोटणारे ते दोघे कोण? हा नवा सवाल गावातील लोकांसमोर आवासून उभा राहिला आहे.
