Spread the love

आळते/ महान कार्य वृत्तसेवा

नांदणीसह कोल्हापूर जिल्ह्याची लाडकी लेक ‘महादेवी उर्फ माधुरी’ हीला परत तिच्या परिवारात पाठवा, असा ठराव आळते ग्रामपंचायतीने केला आहे. लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले यांनी यासाठी पुढाकार घेतला. दरम्यान शनिवारी गावातून मूक मोर्चा काढून अंबानी यांचा निषेध करण्यात आला. यावेळी गाव बंद ठेवण्यात आले होते.

माधुरीला चुकीच्या पद्धतीने कायदा व न्याय व्यवस्थेची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने पेटा या संस्थेने गुजरातमध्ये वनतारा या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. तरी या हत्तीनीला महाराष्ट्राच्या भूमीमध्ये परत आणणण्यासाठी आळते गावचे लोकनियुक्त सरपंच अजिंक्य इंगवले यांनी ग्रामपंचायत ठराव घेऊन त्या गोष्टीस अनुमोदन दर्शवले आहे. तरी  या सर्वांच्या या प्रयत्नांना यश येऊ हीच प्रार्थना त्यांनी यावेळी केली.

या प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य,सदस्या, पोलीस पाटिल रियाज मुजावर,आजी माजी पदाधिकारी,ग्रामस्थ उपस्थित होते. शनिवारी गावातील प्रमुख मार्गावरुन मुख मोर्चा काढून ग्रामपंचायतीच्या निर्णायाचे समर्थन करण्यात आले. या मोर्चामध्ये ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. किसान दूध संस्थेचे अध्यक्ष सुभाष करके, बाळगोंडा पाटील, उद्गोपती धनंजय टारे,. अशोक आळतेकर, मराठा समाज समन्वयक पुंडलीक बिरंजे, माजी उपसभापती प्रविण जनगोंडा, असगर मुजावर, ग्रा. प. सदस्य जावेद मुजावर, संदीप कांबळे, इमाम मुल्ला, अजित कोळाज, उपसरपंच अमित पाटील, बळीराजा दूध संस्थेचे चेअरमन सुनिल पाटील, अनिल हावळ,शिरीष थोरात, आदीसह ग्रामस्थ सहभागी झाले होते.