Spread the love

श्रींचा फोटो व पादुका प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

इचलकरंजी/महान कार्य वृत्तसेवा

इचलकरंजी येथील मंगळवार पेठ परिसरातील महाराष्ट्र श्री पंत भजनी मंडळ येथे श्रींचा फोटो व पादुका प्राणप्रतिष्ठापना सोहळा बुधवार, ता. ३० जुलै व गुरूवार ता. ३१ जुलै रोजी विविध धार्मिक कार्यक्रमात संपन्न झाला.
त् बुधवार, ता. ३० रोजी सकाळी येथील के. एल. मलाबादे चौक ते श्री पंत मंदिर पर्यंत श्रींची प्रतिमा व पादुका यांची मिरवणूक काढण्यात आली,. सकाळी १० वाजून १५ उदकशांती, जलधीवास, गुरूवार, ता. ३१ रोजी सकाळी मिनिटांनी ९ वाजता धान्यदिवास, पुण्यावाहन, देवता स्थापना, अग्निस्थापना हवन, बलिदान पूर्णाहुती देवता स्थापन आरती व नैवद्य असे धार्मिक विधी पार पडले.सदरचा सोहळा डॉ. संजय पंत बाळेकुंद्रीकर व समस्त व मातुल घराणे यांच्या हस्ते तसेच अशोक दास, श्रीहरी कुलकर्णी, तुकाराम वरपे, सदानंद जासूद, सोमनाथ केसळे, सौ. निकीता नाईक, बाळासाहेब जाधव यांच्या उपस्थितीत झाला.सदर कार्यक्रमास परिसरातील तसेच बाहेर गावातून आलेले सेवेकरी, भक्त मंडळी नागरिक उपस्थित होते.