इचलकरंजी प्रतिनिधी / महान कार्य वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केलेच्या आरोपातून संशयित विनायक महालिंगअप्पा मुंजी (राः महालिंगपूर,) याची येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली.ऍड मेहबुब बाणदार यांनी काम पाहिले.इचलकरंजी येथील राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी गावभाग पोलीसात पोक्सो व बलात्कार अंतर्गत खटला दाखल करण्यात आला. त्याचेवर पिडीतेला लग्नाचे आमिष दाखवले, तिचा गर्भपात केला अशा आशयाचे आरोप होते.
दोषारोपपत्र दाखल झाले नंतर सदर खटल्याची सुनावणी येथील सत्र न्यायालयात सुरु झाली. सुनावणीत स्वतः पिडीता, तिचे आई वडील, तपासी अधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक गावभाग गजेंद्र लोहार यांच्या महत्व पूर्ण साक्षी नोंदवण्यात आल्या . त्या सर्वांनीच आरोपी विरोधात साक्षी दिल्या. बचाव पक्षा तर्फे वेगवेगळे पंचनामे, पिडीतेचा वैद्यकीय दाखला कबूल केले. मात्र, संशयिताचे वकील अॅड मेहबुब बाणदार यांनी उलट तपासाद्वारे साक्षीदारांची विसंगती दाखवून दिली. बलात्कार झाला आहे असा स्पष्ट वैद्यकीय दाखला नाही, प्रेम प्रकरणास बलात्काराचे स्वरूप देण्यात आले. जात वेगळी व राज्य वेगळे त्यामुळे प्रेम प्रकरणास विरोध होता. तसेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे व न्याय निवाडे व ग्राह्य मानून निदर्दोष मुक्तता केली. अॅड बाणदार यांना अॅड देवाशिष बोहरा, अॅड सुरजित नायर, अॅड आशपाक देसाई, अॅड सानिया दानवाडे, नंदकुमार नेर्लेकर यांनी सहकार्य केले.
